कोण आहे मोहक कुमार? १२५ चेंडूत ३० षटकार आणि २८ चौकारांसह केल्या इतक्या धावा


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे ते टी-२० मध्ये एकापेक्षा एक विस्फोटक खेळाडूंची फलंदाजी पाहायला मिळते. पण अशीच क्षमता स्थानिक क्रिकेटमध्ये देखील गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. अशाच एका स्थानिक सामन्यात एका १३ वर्षाच्या खेळाडूने अशी फलंदाजी केली ज्याचा कोणी विचार देखील केला नाही.

वाचा- मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाचे कसोटीत पदार्पण; पाहा अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान मिळाले

दिल्लीच्या १३ वर्षीय क्रिकेटपटूने ४० षटकाच्या सामन्यात तुफानी फलंदाजी केली. मोहक कुमार असे या मुलाचे नाव असून त्याने १३७ मिनिटे फलंदाजी केली आणि १२५ चेंडूत ३३१ धावांची खेळी केली. मोहकचा स्ट्राईक रेट २६४.८० इतका होता यावरून त्याची फलंदाजी किती स्फोटक होती याचा अंदाज यावा. या त्रिशतकात मोहकने २८ चौकार आणि ३० षटकार मारले.

वाचा- कानपूर कसोटीत या कारणामुळे भारताचा विजय पक्का; १९८३ पासून कधीच…

दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीचा खेळाडू मोहक कुमारने सोमवारी ही वादळी खेळी केली. ड्रीम चेंजर कप अंडर १३ क्रिकेट स्पर्धेत शिक्षा भारती पब्लिक स्कूल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोहकने एंड्योरेंस क्रिकेट अकादमी अंडर १३ संघाविरु्दध १२५ चेंडूत ३३१ धावा केल्या. विशेष म्हणजे मोहक सलामीला किंवा दुसऱ्या क्रमांकावर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

वाचा- बाप रे! राहुल द्रविड यांनी हे काय केले; अजिंक्य रहाणेसह केली इतकी मोठी चूक

मोहक जेव्हा फलंदाजीला आला होता तेव्हा दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीने ५ धावांवर सलामीचे दोन फलंदाज गमावले होते. संघ अडचणीत असताना मोहकने सूत्रे हाती घेतली आणि गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने २८ चौकार आणि ३० षटकारांच्या मदतीने ३३१ धावा केल्या. मोहकने चौकार आणि षटकाराने २९२ धावा केल्या. तर पळत फक्त ३९ धावा काढल्या. मोहकच्या संघाकडून शिवाई मलिकने ६७ आणि आर्यन भारद्वाजने ४० धावांचे योगदान दिले.

दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीने ४० षटकात ७ बाद ५७६ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरादाखल एंड्योरेंस क्रिकेट अकादमीचा डाव १७.१ षटकात १५३ धावांवर संपुष्टात आला. त्याच्याकडून मेधांशने ५३ चेंडूत १२६ धावा केल्या. पण अन्य खेळाडूंना धावा करण्यात अपयश आले. दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीकडून वामन आणि यतीन सोलंकी यांनी अनुक्रमे ५ आणि ४ विकेट घेतल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: