Uttar Pradesh: यूपीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खंडीत, तणावाचं वातावरण


हायलाइट्स:

  • मऊ जिल्ह्यातील खानपूर गावातील घटना
  • संतापलेल्या ग्रामस्थांनी रानीपूर मार्ग रोखून धरला
  • नवा पुतळा स्थापित झाल्यानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे

मऊ, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडलीय. सराय लखंसी क्षेत्रातील खानपूर गावात स्थानिकांना संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खंडीत अवस्थेत आढळल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला.

मंगळवारी ही घटना घडल्याचं समोर येतंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर विटा फेकण्यात आल्या. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणि हात खंडीत झाला. याबद्दल स्थानिकांना माहिती मिळताच काही वेळातच परिसरात मोठी गर्दी जमा झाली. त्यामुळे वातावरणात काही काळ तणावही निर्माण झाला.

या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी रानीपूर मार्गाला रोखून धरलं आणि या घटनेचा निषेध केला.

Farm laws repeal: ‘कृषी कायदे’ रद्दबादल ठरवणाऱ्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
‘देवस्थानम बोर्डा’चा वाद : भाजप मंत्र्याच्या घरासमोर पुरोहितांचं ‘शीर्षासन’
मऊचे पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. इतकंच नाही तर पोलिसांनी डॉ. आंबेडकरांचा खंडीत पुतळा बदलला जाईल, हेदेखील सुनिश्चित केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नवी प्रतिमा स्थापित करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर परिस्थिती निवळली.

पोलीस अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सतर्कता म्हणून या भागात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.

डॉ. आंबेडकरांचा पुतळा खंडीत करून सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

UP Elections: उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला हादरा
Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, सोनियांच्या घरी पक्षनेत्यांची बैठकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: