मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाचे कसोटीत पदार्पण; पाहा अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान मिळाले


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कानपूर येथे सुरूवात झाली आहे. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा असे दिग्गज खेळाडू नसताना कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कोच राहुल द्रविड यांनी पाहा कोणत्या खेळाडूंना संधी दिली आहे.

वाचा- IND vs NZ Preview: कानपूर कसोटीत या कारणामुळे भारताचा विजय पक्का; १९८३ पासून कधीच…

टॉस-

मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला पहिल्या कसोटीत अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. श्रेयसने याआधी वनडे आणि टी-२०मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. आता त्याला कसोटी संघात देखील स्थान मिळाले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी श्रेयसला कसोटीची कॅप दिली.

वाचा-बाप रे! राहुल द्रविड यांनी हे काय केले; अजिंक्य रहाणेसह केली इतकी मोठी चूक

भारतीय संघात सलामीवीर म्हणून अपेक्षेप्रमाणे शुभमन गिल याला संधी दिली आहे. सामन्याच्या दोन दिवश आधी दुखापतीमुळे केएल राहुल संघाबाहेर झाल्याने गिलला सलामीला संधी मिळाली. गिल सोबत मयांक अग्रवाल हा दुसरा सलामीवीर असेल. मधळ्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांच्यावर जबाबदारी असेल. ऋषभ पंतच्या गैरहजेरीत वृद्धीमान सहाकडे विकेटकिपिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कानपूरची खेळपट्टी पाहता संघात तीन फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. यात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर जलद गोलंदाज इशांत शर्मा आणि उमेश यादव यांना संधी दिली गेली आहे.

असा आहे भारतीय संघ- मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्माSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: