Satej Patil: सतेज पाटील यांच्यापुढे नवा पेच; ‘या’ मुद्द्यावर भाजप हायकोर्टात जाणार


हायलाइट्स:

  • सतेज पाटील यांच्या शपथपत्रावर भाजपचा आक्षेप.
  • शपथपत्रात पाटील यांनी खोटी माहिती दिली.
  • धनंजय महाडिक यांचा दावा, कोर्टात दाद मागणार.

कोल्हापूर: कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात पालकमंत्री सतेज पाटील यांनी खोटी माहिती दिली आहे, काही माहिती लपविली आहे. याबाबत तक्रार करूनही राजकीय दबावामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविला आहे, या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती माजी खासदार व भाजप प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ( Satej Patil Election Affidavit Latest News )

वाचा:राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?; काँग्रेस २ मंत्र्यांना देऊ शकतं डच्चू!

माजी खासदार महाडिक यांनी सांगितले की, पालकमंत्री पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांनी जे शपथपत्र दिले आहे, त्यामध्ये माहिती लपविली आहे, खोटी माहिती दिली आहे. त्यांची कावळा नाका परिसरात ५३ हजार चौरस फूट जागा असताना २३ हजार चौरस फूट जागा असल्याचे नमूद केले आहे. जमीन वाटप प्रकरणात त्यांनी ५४ लाखांचा महसूल बुडविला आहे. तो भरावा म्हणून प्रशासनाने नोटीस दिली असताना आणि त्यांनी ती भरली नसताना कोणत्याही प्रकारचा महसूल प्रलंबित नसल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.

वाचा:देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चेला उधाण

महाडिक यांनी सांगितले की, शपथपत्रात चुकीची माहिती दिली असल्याने पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यासाठी आम्ही आग्रह धरला. पण राजकीय दबावामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. यामुळे या विरोधात गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडेही तक्रार करणार आहोत.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे. पण चुकून पाटील निवडून आले तर त्यांची आमदारकी फार काळ टिकणार नाही. कारण त्यांच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना मते देऊ नयेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम उपस्थित होते.

वाचा:परमबीर सिंग अखेर ‘या’ ठिकाणी सापडले!; लवकरच मुंबईत परतणारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: