Satej Patil: कोल्हापुरात ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणाचा?; महाडिकांना डिवचत पाटील म्हणाले…


हायलाइट्स:

  • शपथपत्राबाबतचे महाडिकांचे आक्षेप सतेज पाटलांनी फेटाळले.
  • कोणत्याही कायदेशीर लढाईला तयार असल्याचे केले स्पष्ट.
  • महाडिकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला: पाटील

कोल्हापूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाडिकांचा पराभव होणार या भीतीपोटीच माजी खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत योग्य ती कागदपत्रे उमेदवारी अर्जासोबत आम्ही जोडलेली आहेत. मैदानात लढण्यापेक्षा कायद्याची भाषा बोलून मैदानातून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. सतेज पाटील जिंकले तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे म्हणून महाडिकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ( Satej Patil Targets Mahadik Family )

वाचा:सतेज पाटील यांच्यापुढे नवा पेच; ‘या’ मुद्द्यावर भाजप हायकोर्टात जाणार

धनंजय महाडिक यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रक काढत त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. ‘या निवडणुकीत, महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते माझ्या विजयासाठी झटत आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. याउलट, महाडिक पाठिंब्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. ज्या प्रमुख गटांच्या जीवावर ते निवडणूक लढवत होते, त्या गटांनी मला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, त्यांना नैराश्य आले आहे. माझ्या विजयाची महाडिकांना खात्री झाल्यानेच ते न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ निवडणुकीच्या १५ दिवसांअगोदर महाडिकांनी आपला पराभव मान्य केला आहे. ज्यावेळी निवडणुकीत आपला पराभव दिसतो, त्यावेळी निवडणुकीतील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन बाकीचे विषय उपस्थित केले जातात, आणि महाडिक तेच करत आहेत’, असे सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाचा:राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?; काँग्रेस २ मंत्र्यांना देऊ शकतं डच्चू!

कोणत्याही कायदेशीर लढाईला तयार!

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आणखी एका पराभवाच्या या नैराश्यामुळेच महाडिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच, यापूर्वी बोललेले मुद्दे घेऊन महाडिक आरोप करत आहेत. महाडिकांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही सुद्धा कोणत्याही कायदेशीर लढाईला तयार आहोत असेही पालकमंत्री पाटील यांनी या पत्रकात पुढे नमूद केले आहे.

मतदारच महाडिकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतील

गेल्या २५ वर्षांत महाडिकांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली आहे. दादागिरी आणि भीती दाखवून अनेकांना गप्प केले आहे. त्यामुळे, या निवडणुकीत हे सर्वजण महाडिकांचा करेक्ट कार्यक्रम नक्कीच करतील. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीतही पराभवाचा तिसरा अंक महाडिकांना पाहायला लावतील असेही, पाटील म्हणाले.

वाचा:परमबीर सिंग अखेर ‘या’ ठिकाणी सापडले!; लवकरच मुंबईत परतणारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: