तरुणाने पोलीस ठाण्याच्या बाहेर केलं असं कृत्य की पोलीसच हादरले!


सांगली : मिरज शहर पोलीस ठाण्याच्या (Sangali Police) आवारात मद्यधुंद अवस्थेतील तरुणानं पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. सर्फराज जमखंडीकर असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जखमी तरुणाचं नाव आहे.

तक्रार देण्यासाठी तो मिरज शहर पोलीस ठाण्यात गेला होता. पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर तिघांना तातडीनं अटक करावी, असा त्याचा आग्रह होता. दारूच्या नशेत त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ५० टक्के भाजलेल्या जमखंडीकर याला पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला.

Ukrainian Girl Dies: बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू; अंधेरीच्या डी. एन. नगरमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज जमखंडीकर हा बुधवारी दुपारी मद्यधुंद अवस्थेत मिरज शहर पोलीस ठाण्यात आला. त्याने आमची तक्रार आहे असं सांगितलं. अबुबकर बागवान, यासीन आणि आयुब या तिघांच्या विरोधात मारहाणीची तक्रार घेण्यात सांगितलं. जमखंडीकर यांची पोलिसांनी तक्रार घेतली. मारहाण करणारे तिघेही बोकड चौकात असल्याचं जमखंडीकर यांनी सांगितलं. त्यानंतर बोकड चौकात पोलीस कर्मचारी पाठवून दिले. परंतु चौकात कोणीच नसल्याने पोलिसांनी जमखंडीकर यांना तुम्ही सकाळी या असं सांगितलं.

जमखंडीकर हा मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत बाहेर गेला. त्यांना अत्ताच अटक करा, म्हणून त्याने पत्नीजवळ असलेली पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यावेळी ठाणे अंमलदार पो.हे.कॉ. वाघमोडे व पो.कॉ. कोळेकर यांनी त्याच्या अंगावरील कपड्यास लागलेली आग गोणपाटाने विझवण्याचा प्रयत्न करुन त्याचे अंगावरील पेटते कपडे फाडून काढले आणि पाणी ओतून आग विझवली.

दरम्यान, या घटनेत ठाणे अंमलदार वाघमोडे यांच्या हाताला भाजलं आहे. सरफराज महंमदअली जमखंडीकर याला सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: