Ukrainian Girl Dies: बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू; अंधेरीच्या डी. एन. नगरमधील घटना


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

युक्रेनहून बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या तरुणीचा बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची बुधवारी अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. अहसेन दुब्येना असे या तरुणीचे नाव असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत डी. एन. नगर पोलिस तपास करीत आहेत. (ukrainian girl dies after falling from 12th floor in dn nagar andheri in mumbai)

क्लिक करा आणि वाचा- ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; घेणार उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट

अहसेन ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. ती अंधेरीच्या मिलेनियर हेरिटेज सोसायटीत पेयिंग गेस्ट म्हणून राहत होती. मंगळवारी रात्री उशिरा ती बाराव्या मजल्यावर मित्रांसोबतपार्टी करीत होती. पार्टीत सर्वांनी मद्यप्राशन केले होते. पहाटेच्या सुमारास अहसेन तोल जाऊन बाराव्या मजल्यावरून पडल्याची माहीती तिच्या मित्रांनी पोलिसांना दिली. डी. एन. नगर पोलिस घटनास्थळी पोहचले. अहसेनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा- ‘कामावर रुजू व्हा, अन्यथा…’; परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना ‘हा’ इशारा

डी. एन. नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून याबाबतची माहीती युक्रेन दुतावासाला दिली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्यासोबतच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पगारवाढीनंतरही एसटी संप मागे घेण्याची घोषणा नाही, संपाबाबत उद्या घेणार निर्णय!Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: