… तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला कर्णधार सापडायला १५ वर्षे लागतील, मायकल क्लार्कचे धक्कादायक वक्तव्य…


मेलबर्न : ज्याच्यावर कोणताही कलंक नाही, जो स्वच्छ प्रतीमेचा आहे, अशा खेळाडूच्या शोधात असाल, तर पुढील १५ वर्ष ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ कर्णधारविना असेल, असा खोचक टोला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लगावला आहे. एका तरुणीला अश्लिल संदेश पाठवल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर टीम पेनने कर्णधार पदाचा राजीनामा दिला. पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

कमिन्सशिवाय माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही या शर्यतीत आहे. क्लार्क म्हणाला की, कारकिर्दीची चुकीची सुरुवात केल्यानंतरही रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक बनला. ‘बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट’मध्ये क्लार्क म्हणाला की, ‘माझ्या कारकीर्दीत रिकी पाँटिंग एक उत्तम कर्णधार होता. जर असे प्रकरण झाले असते, तर तो कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकला नसता.’

क्लार्क म्हणाला, “बोर्बन अँड बीफस्टीक (नाईट क्लब) येथे त्याचे भांडण झाले होते. यावेळी मारामारीही झाली होती. या कारणामुळे तुम्ही त्याच्यावर जबाबदारी सोपवू शकत नाही? तो एक चांगले उदाहरण आहे. त्याने तुम्हाला वेळ, अनुभव, परिपक्वता, उच्च स्तरावर खेळणे आणि संघाचे नेतृत्व यामुळे त्याच्यात बदल घडून आले.

क्लार्कने कबूल केले की, “ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधारासाठी उच्च मापदंड असणे गरजेचे आहे, पण जर त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या गेल्या, तर फारच कमी पर्याय उरतील. खेळाडूंचा पाठिंबा कुठे आहे? जर तुम्हाला निष्कलंक कर्णधार हवा असेल, तर तुम्ही १५ वर्षे कर्णधाराचा शोध घ्याल, पण आपल्याकडे कर्णधार नसेल.”

पेनने आपले पद का सोडले, याबद्दल क्लार्क म्हणाला, “ही गोष्ट मला समजली नाही. त्याने चार वर्षांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ही माहिती दिली होती, त्यामुळे त्याने तुम्ही मला काढून टाकू शकता, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगायला हवे होते. तो प्रामाणिक होता आणि त्याला या प्रकरणी निर्दोष घोषित करण्यात आले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: