बंदीच्या भीतीने ट्रेडर्स धास्तावले; चौफेर विक्रीने बिटकॉइनसह क्रिप्टो करन्सी कोसळले


हायलाइट्स:

  • क्रिप्टो करन्सीच्या बेकायदा गुंतवणुकीला आळा घालणार
  • सरसकट बंदी घालण्याच्या केंद्र सरकारने सुरु केल्या हालचाली
  • यामुळे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत.
  • आज क्रिप्टो करन्सी बाजारात चौफेर विक्री केली.

मुंबई : देशात क्रिप्टो करन्सीच्या बेकायदा गुंतवणुकीला आळा घालण्यासाठी सरसकट बंदी घालण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत. यामुळे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले असून आज क्रिप्टो करन्सी बाजारात चौफेर विक्री केली.

आज बुधवारी क्रिप्टो ट्रेडर्सने जोरदार विक्री केली. यामुळे बिटकॉइनचा भाव तब्बल १७ टक्क्यांनी घसरला. त्याशिवाय इथेरियमचा भाव १४ टक्क्यांनी घसरला. डोजेकॉइन २० टक्क्यांनी तर पोलकाडॉट १४ टक्क्यांनी कोसळला. तिथेरच्या किमतीत देखील १७ टक्के घसरण झाली असल्याचे वझीरेक्स या क्रिप्टो एक्सचेंजने म्हटलं आहे.

दोन बँंकांचे खासगीकरण ; कर्मचारी संघटना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलनाचा दिला इशारा
बिटकॉइननंतर दुसरा लोकप्रिय डिजिटल कॉइन असलेल्या इथेरियमच्या किमतीत मागील २४ तासात ५.७४ टक्के घसरण झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव ३५२९२६ रुपये इतका आहे. तिथेर या सर्वात स्वस्त असलेल्या क्रिप्टो करन्सीचा भाव ८१.०२ रुपये इतका आहे. त्यात आज १.८९ टक्के वाढ झाली. कॉइनमार्केट कॅपनुसार आज जागतिक बाजारात बिटकॉइनचा आणि एक्सआरपीचा भाव १ टक्क्यांनी कोसळला. कार्डानोचा भाव ७ टक्क्यांनी कोसळला. बिटकॉइनने नुकताच ६९००० डॉलरची विक्रमी पातळी गाठली होती.

शेअर बाजारात गुंतवणूक करताय; या चांगल्या सवयी तुम्हाला बनवतील स्मार्ट गुंतवणूकदार!
मागील २४ तासात बिटकॉइनचा भाव २.४६ टक्क्यांनी कमी होऊन ५६०७८ डॉलर इतका झाला आहे. शिबूचा भाव ०.००००३ डॉलर असून त्यात १०.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. इथेरियमचा भाव २.१६ टक्क्यांनी कमी झाला असून तो ४२००.८४ डॉलर आहे. एक्सआरपी या क्रिप्टो करन्सीच्या किमतीत ३.४४ टक्के घसरण झाली असून त्याचा भाव १.०१ डॉलर आहे. सोलानाच्या किमतीत ३.१२ टक्के घसरण झाली असून त्याचा भाव २१०.२ डॉलर आहे. डोजेकॉइन ०.२१ डॉलर असून त्यात ९.४६ टक्के घसरण झाली आहे.

लोकप्रिय होतोय बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड; मात्र लक्षात ठेवा दोन बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड एकसारखे नसतात
केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सींवर आळा घालण्याची तयारी केली आहे. यासाठी २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विधेयकात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद आहे.

क्रिप्टोवर बंदी? RBI आणणार स्वत:चा ‘बिटकॉइन’, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत
विधेयकाच्या मदतीने, भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत डिजिटल चलन जारी करण्यासाठी एक सोयीस्कर फ्रेमवर्क मिळेल. क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी विधेयक, 2021 यासह एकूण २६ विधेयके हिवाळी अधिवेशनात मांडली जातील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: