प्रेमात पडलेल्या तरुणीला तब्बल १ कोटी रुपयांचे दागिने पाठवल्याचं सांगितलं, मात्र….


हायलाइट्स:

  • फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
  • पाचोरा तालुक्यातील ३१ वर्षीय तरुणीला घातला गंडा
  • सायबर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : सोशल मीडियावरील ओळखीनंतर झालेल्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील ३१ वर्षीय तरुणीची २ लाख ५५ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud Case) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी निवांत चित्रे अशा नावाने संपर्क करणार्‍या व्यक्तीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील ३१ वर्षीय तरुणीची ‘मराठी मॅट्रीमोनी डॉट कॉम’ या साईटवर निवांत चित्रे असं नाव सांगणार्‍या व्यक्तीशी संपर्क झाला. त्याने तरुणीशी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधत सलगी वाढवून लग्न करण्याचं आश्वासन दिलं.

धक्कादायक: तिने आत्महत्या केल्याचे कळताच ‘तो’ तिच्या घरी गेला आणि…

‘परदेशातून एक पार्सल पाठवलं असून त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किमंत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तू पाठवलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही,’ असं सांगून संशयिताने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाईन घेतले.

या काळात ना पार्सल आले ना संबंधिताशी संपर्क झाला. पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: