स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूक


हायलाइट्स:

  • राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने आयपीओची घोषणा केली आहे.
  • समभाग विक्रीतून कंपनी ७२४९ कोटी उभारणार आहे.
  • यासाठी प्रती शेअर ८७० ते ९०० रुपये किंमतपट्टा जाहीर केला आहे.

मुंबई : भांडवली बाजारातील नावाजलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स या कंपनीने परंभीक समभाग विक्रीची घोषणा केली आहे. समभाग विक्रीतुन कंपनी ७२४९ कोटी उभारणार आहे. यासाठी प्रती शेअर ८७० ते ९०० रुपये किंमतपट्टा जाहीर केला आहे.

पायरेट्स स्टॉक एक्सचेंज ; सोमालियाचे समुद्री चाचे करतात याचे व्यवस्थापन, वाचा सविस्तर
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने आयपीओचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयपीओ ३० नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी २ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येईल. आयपीओमध्ये ‘क्यूआयबी’साठी ७५ टक्के, ‘एनआयआय’साठी १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

दोन बँंकांचे खासगीकरण ; कर्मचारी संघटना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलनाचा दिला इशारा
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्समध्ये सेफकॉर्प या कंपनीची सर्वाधिक ४५.३२ टक्के हिस्सेदारी आहे. तर राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्समध्ये १७.२६ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे आयपीओतीळ प्रती शेअरचे मूल्यांकन पाहता झुनझुनवाला दाम्पत्यांची गुंतवणूक किमान सहा पटीने वाढेल असे बोलले जाते. कंपनीच्या प्रवर्तकांकडे ६२.८० टक्के हिस्सा आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताय; या चांगल्या सवयी तुम्हाला बनवतील स्मार्ट गुंतवणूकदार!
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचा ७२४९ कोटींचा आयपीओ हा चालू आर्थिक वर्षातील प्राथमिक बाजारातला तिसरा मोठा आयपीओ ठरणार आहे. यापूर्वी बाजारात पेटीएमने १८३०० कोटी आणि झोमॅटोने ९३७५ कोटींचा आयपीओ आणला होता. स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे बाजार मूल्य ५१००० कोटींच्या आसपास आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: