st workers strike: पगारवाढीनंतरही एसटी संप मागे घेण्याची घोषणा नाही, संपाबाबत उद्या घेणार निर्णय!


हायलाइट्स:

  • राज्य शासनाने संपावर तोडगा म्हणून केली एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ.
  • पगारवाढीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याचा निर्णय नाही.
  • संप मागे घ्यायचा की नाही त्याचा निर्णय उद्या घेणार- आमदार सदाभाऊ खोत.

मुंबई: गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी अशी ४१ टक्के पगारवाढ देत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राज्य शासनाच्या पगारवाढीच्या प्रस्तावावर विचार करून संप मिटवावा की सुरूच ठेवावा याबाबत उद्या निर्णय घेण्यात येईल, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट केले आहे. (despite the announcement of pay hike st workers have not called off the strike a decision will be taken tomorrow, said mla sadabhau khot)

सदाभाऊ खोत यांनी संपाचा निर्णय संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलूनच जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे. मात्र, पगारवाढीच्या घोषनेनंतरही कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे दिसले. मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेले संपकरी मात्र पगारवाढीवर खुश असल्याचे दिसले नाही. आमची विलिनीकरण हीच प्रमुख मागणी असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आमचा संप आम्ही सुरूच ठेवू असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा- एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; पाहा किती वाढला पगार?

पगारवाढ म्हणजे निव्वळ फसवणूक असून विलिनीकरण केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचे कर्मचारी सांगत आहे.

समिती जो निर्णय देईल तो मान्य- अनिल परब

दरम्यान, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून हा निर्णय सर्वस्वी त्रिसदस्यीय समितीने घ्यायचा आहे. समितीने विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यास राज्य सरकार तो स्वीकारेल, असे अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘जर एसटीचं विलिनीकरण केलं तर…’; शरद पवार यांनी मांडला महत्वाचा मुद्दा

संपकरी एसटी कर्मचारी एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणावर ठाम असल्याने राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने विलिनीकरणाबाबत एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली असून, या समितीचा निर्णय येईपर्यंत राज्य सरकार विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. अशा परिस्थितीत काही तोडगा काढता यावा यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी काल आणि आज असे दोन दिवस चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव परब यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर परिवहन मंत्री परब यांनी पत्रकार परिषद घेत पगारवाढ घोषित केली.

क्लिक करा आणि वाचा- शिशिकांत शिंदेंच्या पराभवाचे शरद पवारांचे एका वाक्यात विश्लेषण, म्हणाले…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: