लोकप्रिय होतोय बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड; मात्र लक्षात ठेवा दोन बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड एकसारखे नसतात


हायलाइट्स:

  • सेबीच्या व्याख्येनुसार ही एक अशी श्रेणी आहे जिथे इक्विटी आणि डेटमधील गुंतवणूक वैविध्यतेनुसार हाताळली जाते.
  • कोणत्याही मालमत्ता वर्गात कोणतीही कमाल किंवा किमान गुंतवणूक मर्यादा नसते.
  • याचा अर्थ की प्रत्येक बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाचे व्यवस्थापन करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

गौरव जाजू, मुंबई : खाद्य संस्कृतीमध्ये बिर्याणीला एक विशेष महत्व आहे. हे एक स्वादिष्ट भोजन नसून त्याची एक विशिष्ट चव, सुगंध आणि बघायला सुद्धा छान वाटते. जेवणाच्या वेळी तर बिर्याणीची चव वर्णन करू शकत नाहीत. मात्र असं असलं तरी दोन वेगवेगळ्या बिर्याणी एक सारख्या नसतात. हीच संकल्पना म्युच्युअल फंडाची श्रेणी बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाला (BAF) सुद्धा लागू होते.

तेजी परतली ; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, या क्षेत्रात खरेदीचा ओघ
जर तुम्ही एक हैदराबादी बिर्याणीची तुलना लखनऊ बिर्याणीसोबत केली तर एक खाद्यप्रेमी याला एक चेष्टा समजेल. बटाट्याने भरलेल्या कोलकाता बिर्याणीचे काय, जी केरळच्या बिर्याणीपेक्षा खूपच वेगळी असते? जिथे एखाद्या बिर्याणीची चव तिखट असू शकते तर दुसऱ्या बिर्याणीची चव त्याहून वेगळी असू शकते.

म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडांची श्रेणी आणि बिर्याणीमध्ये काय समानता आहे? पुढे विचाराल की यामध्ये काय तुलना आहे? जसे बिर्याणीचं एक वेगळं जग आहे तसेच म्युच्युअल फंडांच्या श्रेणीत बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाचे आहे. या फंडांचे स्वतःचे असे वेगळे विश्व आहे.

भांडवली बाजार नियंत्रक सेबीने काही वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणावेळी बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाची श्रेणी सुरु केली होती. सेबीच्या व्याख्येनुसार ही एक अशी श्रेणी आहे जिथे इक्विटी आणि डेटमधील गुंतवणूक वैविध्यतेनुसार हाताळली जाते. कोणत्याही मालमत्ता वर्गात कोणतीही कमाल किंवा किमान गुंतवणूक मर्यादा नसते. याचा अर्थ की प्रत्येक बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाचे व्यवस्थापन करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन वर्षात पगारात घसघशीत वाढ होणार,हे आहे कारण
एक बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड इक्विटी आणि डेटमध्ये ३० ते ८० टक्के किंवा ० ते १०० टक्क्यांच्या निश्चित मर्यादेत गुंतवणूक करू शकतो. इक्विटीसाठी सर्वसाधारणपणे गुंतवणूक ही ‘प्राईस टू बुक’ किंवा ‘प्राईस टू अर्निंग’ मॉडेल या तत्वानुसार केली जाते. बहुतांश म्युच्युअल फंड कंपन्या स्वतःचे गुंतवणूक मॉडेल विकसित करतात आणि त्यानुसार गुंतवणूक करतात आणि म्हणूनच बिर्याणीप्रमाणे कोणतेही दोन बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड एकसारखे नसतात. यासाठी बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडात गुंतवणूक करताना कोणालाही स्व:ताची जोखीम घेण्याची किती क्षमता आहे याचा विचार करायला हवा.

क्रिप्टोवर बंदी? RBI आणणार स्वत:चा ‘बिटकॉइन’, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत
मागील तीन वर्षात काही बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाचे इक्विटीमधील निव्वळ गुंतवणूक प्रमाण ७० ते ८० टक्के राहिले आहे. याची आणखी एक चांगली बाब म्हणजे अशा प्रकारच्या ऑफर्सला हायब्रीड फंडांसोबत जोडता येऊ शकते. यामध्ये जास्तीत जास्त इक्विटीशी संबंधित जोखिमेचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला अशी उत्पादने आहेत ज्यांची इक्विटीमधील सरासरी शुद्ध गुंतवणूक तुलनेने कमी आहे, जसे की मागील ३ वर्षात हे प्रमाण ९ ते १५ टक्क्यांच्या मर्यादेत आहे.

मोठया पडझडीतून सोने सावरले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
वास्तविक मागील ३ वर्षात BAF योजनांची कामगिरी चांगली होत असल्याचे दिसून आले आहे. इक्विटीचे मूल्यांकन अधिक असल्याने यामध्ये सध्यस्थितीत इक्विटीमधील गुंतवणूक स्तर किमान पातळीवर आहे.थोडक्यात या श्रेणीत विविधता आहे. यासाठी कोणालाही आपल्या आवश्यकतेनुसार योग्य निवड करण्यापूर्वी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

BAF श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल दहा वर्षांपूर्वी भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात पहिल्यांदा BAF सादर केला होता. ते असे मानतात की ही श्रेणी बाजारातील अस्थिरतेचा लाभ घेण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये BAF चा समावेश असायला हवा. आमीष आणि भीती दूर सारून तुम्ही BAF ला किमान किमतीवर खरेदी करणे आणि महाग झाल्यावर विक्री करणे यासाठी ओळखले जाते. दशकभराहून अधिक अनुभव असलेल्या अंतर्गत धोरणानुसार फंड इक्विटीमधील गुंतवणूक प्रमाण ३० टक्के आणि ८० टक्क्यांच्या दरम्यान बदलत असतो. जो बहुतांशवेळा प्राईस टू बुकवर आधारित असतो. हा अशा फंडांमधील एक फंड आहे जो मार्केट सायकलच्या कसोटीवर पूर्णपणे स्वतःला सिद्ध करू शकला आहे.

नव्या फंड योजनांमध्ये विक्रमी गुंतवणुकीनुसार BAF श्रेणी मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. प्रत्येकजण या श्रेणीच्या लोकप्रियतेवर स्वार होण्याची वाट बघत आहे. मात्र BAF श्रेणीत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागारांची चर्चा करणे आवश्यक आहे. आपण अशा BAF योजनांना पसंदी देणार जी लोकप्रिय आहे आणि कसोटीवर सिद्ध झालेली आहे.

(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रादेशिक विभागाच्या रिटेल सेल्सचे रिजनल हेड आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: