st workers strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजच मिटणार?; राज्य सरकारकडून मोठ्या घोषणेची शक्यता


हायलाइट्स:

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब संध्याकाळी घेणार पत्रकार परिषद.
  • राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता.
  • एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतही राज्य सरकारचा विचार स्पष्ट होण्याची शक्यता.

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल मंगळवारी आणि आज बुधवारी झालेल्या बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. या बैठकांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मोठा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेत असून ते या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मोठी घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (The state government is likely to make a big announcement today regarding the strike of ST workers)

काल मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत अंतरिम पगारवाढीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आजही महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘जर एसटीचं विलिनीकरण केलं तर…’; शरद पवार यांनी मांडला महत्वाचा मुद्दा

विशेष म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीबाबतचा प्रस्ताव घेऊन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करेल असे संकेत मिळत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- शिशिकांत शिंदेंच्या पराभवाचे शरद पवारांचे एका वाक्यात विश्लेषण, म्हणाले…

कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी विलिनीकरण हीच

राज्य सरकार पगारवाढीचा निर्णय घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना करेल असे सांगितले जात आहे. मात्र विलिनीकरणाबाबत राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतला याबाबत अजूनही स्पष्टता नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेणार असल्याचे सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मात्र, काल आणि आज झालेल्या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नेमका काय तोडगा किंवा मधला मार्ग निघाला हे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषदेत सांगतील, असे म्हटले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- घोटाळे लपवण्यासाठीच शिवसेनेसोबत सत्तेत सहभाग; ओवेसींचा राष्ट्रवादीवर निशाणाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: