राज्यात नक्की चाललंय काय?; वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पुन्हा महिलेला चिरडलं!


हायलाइट्स:

  • वाळू वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली
  • भरधाव वाहनाने महिलेला चिरडलं
  • महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव : जळगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात टॅक्टर व डंपरच्या साहाय्याने होणारी वाळू वाहतूक महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठली आहे. जळगाव शासकीय रुग्णालयातून ड्युटी संपवून भुसावळ येथे जाणाऱ्या दुचाकीस्वार अधिपरिचारीकेला मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता जळगाव-भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्याजवळ घडली. प्रेरणा अमोल सपकाळे (वय ३२ रा. भुसावळ) असं मृत अधिपरिचारीकेचं नाव आहे. (Jalgaon Accident Latest News)

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एस.एन.सी.यू. या वॉर्डात प्रेरणा सपकाळे या अधिपरिचारीका म्हणून कार्यरत आहेत. प्रेरणा या भुसावळ येथे कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे त्या आज बुधवारी दुपारी दोन वाजता ड्युटी संपल्यावर आपल्या दुचाकीवरुन (एम.एच. १९ डी.पी.३५९६) भुसावळ येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र वाटतेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

जळगाव- भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यावरुन जात असताना प्रेरणा यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक देत दुचाकीसह प्रेरणा यांना अक्षरश: चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरच्या पुढच्या चाकाखाली आलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात प्रेरणा यांचा जागीच मृत्यू झाला.

कागदपत्रावरुन पटली ओळख

अपघात झाल्यानतंर प्रेरणा यांच्या बॅगममधील कागदपत्रावरुन त्यांची ओळख पटली. अवघ्या काही क्षणातच नशिराबाद पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी प्रेरणा यांचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला.

चार वर्षीय चिमुकल्याचे मातृछत्र हरपलं; रुग्णालयात आक्रोश

प्रेरणा यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानतंर त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णलयातच आक्रोश केला. त्यानतंर आलेल्या प्रेरणा यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. प्रेरणा यांच्या पश्चात आर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेले पती अमोल सपकाळे व चार वर्षीय मुलगा अन्वीत असा परिवार आहे. आजच्या या दुर्घटनेने या चिमुकल्याचंही मातृछत्र हरपलं आहे.

डंपरचालकास अटक

घटनास्थळी आलेल्या नशिराबाद पोलिसांनी डंपर चालक मिलिंद माळी यास ताब्यात घेतलं. त्यानतंर घटनास्थळावरुन अपघातग्रस्त वाहने हलवून ती पोलीस ठाण्यात आणली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: