Pakistan: ‘देश चालवण्यासाठी पैसे नाहीत’, पाकिस्तान पंतप्रधानांनी देशवासियांसमोर टेकले हात!


इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारकडे देश चालवण्यापुरते पैसेही शिल्लक नसल्याचं सांगत देशवासियांसमोर हात टेकलेत. ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम‘च्या उद्घाटन प्रसंगी पाक पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर जाहीर भाष्य केलंय.

‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’चं उद्घाटन

पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू’च्या पहिल्या ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पाक पंतप्रधानांनी हे विधान केलंय. ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’द्वारे करचुकवेगिरी करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्याकडून करवसुली केली जाणार आहे.

पाकिस्तानसमोरचं सर्वात मोठं आव्हान

‘देश चालवण्यासाठी पुरेसे पैसेन नसणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. परदेशांकडून उधार घेणं भाग पडतं असल्यानं पाकिस्तानवर कर्जाचं ओझं वाढत चाललंय’ असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलंय.

कर वसुलीत कमी आणि वाढत्या परदेशी कर्जामुळे पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढावल्याचंही इम्रान खान यांनी म्हटलंय. हा प्रश्न देशाच्या आर्थिक प्रश्नासोबतच सुरक्षेच्या प्रश्नाशी निगडीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

जिनपिंग म्हणतात, चीनला दक्षिणपूर्व आशियावर वर्चस्व नको!
सुधीर चौधरी ‘दहशतवादी’, UAE राजकन्येच्या टीकेनंतर कार्यक्रमातून वगळलं नाव

IMF कडून आर्थिक मदत

नुकतंच, पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाकडून (IMF) घेतलेल्या ६ अरब डॉलर बेलआऊट पॅकेजचा पुनरुद्धार सुनिश्चित करण्यासाठी खर्चात कपात आणि अधिक कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे, उत्पन्न कमी आहे आणि खर्च अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली सुरळीत लागू होऊ शकली नाही. लोकांनी करचुकवेगिरी केली. ही चांगली गोष्ट नाही, परंतु लोकांना ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही. कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते, असं म्हणत इम्रान खान यांनी नागरिकांना करप्रणालीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तान महागाईनं बेजार

पाकिस्तानवर १० वर्षांपूर्वी असलेलं ६ ट्रिलियनचं कर्ज आज ३० ट्रिलियनवर पोहल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीय. पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार शौकत तारीन यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात संसदेत ‘स्टेट बँक ऑफ फाकिस्तान सुधारणा विधेयक’ मांडलं जाणार आहे. तसंच येत्या काही महिन्यांत देशात वीजदरांतही वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.

सोबतच, इम्रान खान यांनी आपल्या सरकारचीही पाठ थोपटली. आपल्या कार्यकाळात रेकॉर्डब्रेक करवसुली झाल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं.

उल्लेखनीय म्हणजे, इम्रान खान यांनी पाकिस्तानला परदेशी कर्जांतून मुक्त करून ‘रियासत ए मदीना’ बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता मात्र देश कंगाल झाल्याची कबुली त्यांनी देशवासियांसमोर दिलीय.

Chemical Castration: पाकिस्तान संसदेचा ऐतिहासिक निर्णय, बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवणार
चीनचा जन्मदर घसरला, लोकसंख्येची घट रोखण्यासाठी सरकारवर दबावSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: