IND vs NZ: क्रिकेटपटूंना फक्त हलालच खायला मिळणार का, गदारोळ वाढल्यानंतर बीसीसीआयने स्पष्टीकरण


नवी दिल्ली : कानपूरमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा केटरिंग मेनू उघड झाला होता. मेनूमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, बीफ आणि पोक दिले जाणार नाही. तसेच जे काही मांस बनवले जाईल, ते हलाल मांसापासूनच बनवले जाईल. सहाय्यक कर्मचारी आणि वैद्यकीय टीमने खेळाडूंच्या पोषणाचा विचार करून ही आहाराची यादी तयार केली आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठा खुलासा केला आहे.

टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवरून वाढलेला गोंधळ पाहून बीसीसीआयला पुढे येत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. भारतीय खेळाडूंना फक्त हलाल मीट दिले जाईल, अशी सर्व वृत्ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी फेटाळून लावली आहेत. धुमाळ म्हणाले की, ‘खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ काहीही खाऊ शकते, हा त्यांच्या वैयक्तिक आवडीचा विषय आहे. मंडळाने अशी कोणतीही योजना कधीच केलेली नाही.’

पोक-बीफ मिळणार नाही
रेसिपीमध्ये दोन प्रकारचे मांस नमूद केले आहे. चिकन (पोल्ट्री) आणि बकरीचे मास. सूचीबद्ध मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये भाजलेले चिकन, भाजलेले बकरीचे मास, काळी मिरचीच्या सॉससह लँब चॉप्स, चिकन थाई करी, मसालेदार ग्रील्ड चिकन, गोवन फिश करी, तंगडी कबाब आणि फ्राइड विथ गार्लिक चटणी चिकन यांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर गोंधळ
अरुण धुमाळ यांच्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास, डाएट प्लॅनबद्दल याआधी कधीच बोलणे झालेले नाही, त्यामुळे तो लादण्याचा मुद्दा निराधार आहे. काय खावे आणि काय खाऊ नये, हे बीसीसीआय कोणाला सांगत नाही. टीम इंडियाचा नवा मेनू इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बीसीसीआयचा बँड वाजवला. त्यामुळे बीसीसीआय प्रचंड ट्रोल झाले आहे.

बीसीसीआयच्या खजिनदारांच्या स्पष्टीकरणानंतर टीम इंडिया आता खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. समोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान आहे. कारण गेल्या एक-दोन वर्षांत किवी संघाने भारताला महत्वाच्यावेळी धक्के दिले आहेत. भारताला ट्वेन्टी-२० आणि २०१९ साली झालेल्या विश्वचषकात त्यांनी पराभूत केले होते. त्याचबरोबर विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्येही न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: