खासगीकरणाची चर्चा,शेअरला तेजी; ‘या’ दोन सरकारी बँंकांचे शेअर्स २० टक्क्यांनी वाढले


हायलाइट्स:

  • दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणू शकते.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे.
  • दोन्ही बँकांच्या शेअरमध्ये आज २० टक्क्यांनी वाढ झाली.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आणखी दोन सार्वजनिक बँकांचे (PSB) खासगीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणू शकते. सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे खासगीकरण करू शकते. हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या बँकांच्या खासगीकरणाच्या बातम्यांमुळे बुधवारी (२४ नोव्हेंबर) दोन्ही बँकांच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली.

क्रिप्टोवर बंदी? RBI आणणार स्वत:चा ‘बिटकॉइन’, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. आता या दिशेने काम सुरू झाले आहे.

मोठया पडझडीतून सोने सावरले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
IOB चे शेअर्स २० टक्क्यांनी वाढले
खासगीकरणाच्या बातम्यांमुळे, इंडियन ओव्हरसीज बँकेचे (IOB)शेअर्समध्ये २० टक्क्यांची तेजी आली होती. बीएसईवर शेअर २० टक्क्यांनी वाढून २३.८० रुपयांवर पोहोचला होता. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर १५ टक्क्यांनी वाढून २३.६५ रुपयांवर पोहोचला. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर ९ टक्क्यांनी तर बँक ऑफ इंडियाचा शेअर ३ टक्क्यांनी वाढला आहे.

तेजी परतली ; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, या क्षेत्रात खरेदीचा ओघ
पहिल्या टप्प्यात एसबीआयमध्ये विलीनीकरण
पहिल्या टप्प्यात पाच सहयोगी बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय विजया बँक आणि देना बँक या दोन बँका बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आल्या. सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँका शिल्लक राहिल्या आहेत.

इंडेक्स फंडात गुंतवणूक संधी; ‘एडलवाईज एएमसी’चा लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड खुला
निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख कोटी उभारण्याचे लक्ष्य
१ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना सरकारने निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणासाठी १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. तसेच चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली होती. यावेळी अर्थमंत्र्यांनी एलआयसीचा आयपीओ आणण्याची घोषणाही केली होती. तसेच बीपीसीएलमधील हिस्सा विकूनही निधी गोळा करणार असल्याचे सरकारने म्हटले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: