IND vs NZ : भारतीय खेळाडूंपेक्षा राहुल द्रविडच ठरतोय भारी; कानपूर कसोटीपूर्वी मैदानात काय घडले पाहा…


INDvsNZ : कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेपासून भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे आणि जिथे जिथे सामने होत आहेत, तिथे लोक त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी मोठ्या संख्येत हजेरी लावत आहेत. जयपूर, रांची आणि कोलकातानंतर आता कानपूरच्या कसोटी सामन्यापूर्वी असेच काहीसे चित्र दिसून आले. कानपूरमध्ये सराव सत्रासाठी जेव्हा राहुल द्रविड ग्रीन पार्क स्टेडियममध्ये उतरला, तेव्हा सगळ्यांच्या नजरा द्रविडवर खिळल्या होत्या. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांमध्ये भारतीय प्रशिक्षकासाठी असलेली क्रेझ स्पष्टपणे दिसून आली. त्यापैकी काहीजण द्रविडसोबत सेल्फी काढतानाही दिसले. यावेळी काहीजणांनी द्रविड, द्रविड अशा आरोळ्याही ठोकल्या. रिकाम्या स्टेडियममध्ये चाहत्यांचा हा आवाज बराच वेळ ऐकू येत होता.

राहुल द्रविडची फॅन फॉलोइंग पहिल्यापासून अशी राहिली नाही. कारण त्याच्या कारकीर्दीवेळी चाहत्यांना त्याच्यापेक्षा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारखे क्रिकेटपटू जास्त आवडत, पण निवृत्तीनंतर द्रविडने भारत अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघांसोबत काम केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. सोशल मीडियापासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत द्रविडच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. द्रविडने नवख्या खेळाडूंमध्ये कसा बदल घडवून आणला याची बरीच चर्चा झाली. आता तो टीम इंडियासोबत जोडला गेल्याने त्याच्याबद्दलची क्रेझ वाढली आहेच, पण संघाकडून असलेल्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत.

दरम्यान, कानपूरमधील पहिल्या कसोटीपूर्वी २३ नोव्हेंबर रोजी राहुल द्रविड जेव्हा मैदानावर आला, तेव्हा त्याने प्रथम सरावासाठीची खेळपट्टी पाहिली. त्यानंतर शॅडो बॅटिंग केली. प्रत्येक वेळी सराव सत्रापूर्वी त्याने हीच पद्धत अवलंबली. त्यानंतर त्याने ज्यावर सामना खेळला जाणार आहे, ती खेळपट्टी पाहिली आणि नंतर तो नेट सरावाकडे निघून गेला. द्रविडने नंतर स्लिप कॅचिंगचा सराव करून घेतला.

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ही टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडची पहिली कसोटी मालिका आहे. त्याने टीम इंडियासोबत टी-२० मालिकेत ३-० असा धडाक्यात प्रवास सुरू केला आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताला अजून २०२२ चा टी-२० विश्वचषक आणि २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. ही दोन सर्वात मोठी आव्हाने त्याच्यासमोर आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: