सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन वर्षात पगारात घसघशीत वाढ होणार,हे आहे कारण


हायलाइट्स:

  • महागाई भत्ता (DA) १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला आहे.
  • केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात आणखी एक सुखद धक्का देऊ शकते.
  • सरकार कर्मचाऱ्यांच्या पे बँडच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. महागाई भत्ता (DA) १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात आणखी एक सुखद धक्का देऊ शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या पे बँडच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे. ही वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.

तेजी परतली ; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, या क्षेत्रात खरेदीचा ओघ
पुढील वर्षी होऊ शकते घोषणा
किमान वेतन १८,००० वरून २६,००० रुपये आणि फिटमेंट फॅक्टर २.५७ पट वरून ३.६८ पट वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी संघटना दीर्घकाळापासून करत आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ होईल, असा खुलासा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. पुढील वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

मोठया पडझडीतून सोने सावरले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
किमान ८००० रुपयांची वाढ
सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत २.५७ टक्के मानधन मिळत आहे. ते ३.६८ टक्क्यांपर्यंत वाढवल्यास मानधनात किमान ८,००० रुपयांची वाढ होईल. जर एखाद्याचे किमान वेतन १८,००० रुपये असेल, तर ८,००० रुपयांच्या वाढीसह ते २६,००० रुपये होईल. याशिवाय जानेवारी २०२२ मध्ये महागाई भत्ता किती वाढवायचा याबाबतचा निर्णय झालेला नाही, तरीही जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे.

इंडेक्स फंडात गुंतवणूक संधी; ‘एडलवाईज एएमसी’चा लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड खुला
अर्थसंकल्पामध्ये होणार समावेश
केंद्रातील काही विभागांमध्ये डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत पदोन्नतीही करण्यात येणार आहे. याशिवाय २०२२ च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. अहवालानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यास मान्यता देऊ शकते आणि अर्थसंकल्पाच्या खर्चात त्याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: