देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चेला उधाण


मुंबईः राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवीन निवासस्थानी पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे नवे निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यादेखील उपस्थित होत्या. मात्र, ही बैठक राजकीय आहे की कौटुंबीक याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आली नाहीये. देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचाः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नाराजीनाट्य? ‘त्या’ व्हायरल मेसेजमुळ गोंधळाचे वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तसंच, काहीवेळापूर्वीच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र हे थेट राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसे व भाजप एकत्र येणार का?, असे तर्क वितर्क लढवले जात होते. त्यामुळं आज अचानक देवेंद्र फडणवीस- राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहचल्यामुळं या चर्चा आता पुन्हा रंगल्या आहेत.

वाचाः लोणावळ्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार

नव्या घरी भेट

राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय, मध्यंतरी राज ठाकरे यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळं प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस राज यांची भेट घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: