क्रिप्टोवर बंदी? RBI आणणार स्वत:चा ‘बिटकॉइन’, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत


हायलाइट्स:

  • रिझर्व्ह बँकेने स्वतःचे डिजिटल चलन आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आरबीआय सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनाबाबत खूप जागरुक आहे.
  • जगभरात क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वतःचे डिजिटल चलन आणण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय डिसेंबरपर्यंत त्यांच्या डिजिटल चलनासाठी प्रायोगित तत्वावर सुरू करू शकते, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. दास म्हणाले की, आरबीआय टप्प्याटप्प्याने देशात डिजिटल चलन आणण्याचे काम करत आहे. आरबीआय सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनाबाबत खूप जागरुक आहे. नवीन उत्पादन असल्यामुळे त्यात कोणत्याही गडबडीची शक्यता नाकारता येत नाही.

तेजी परतली ; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, या क्षेत्रात खरेदीचा ओघ
जगभरात क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत आहे. परिणामी, भारतातही दिवसेंदिवस गुंतवणुकदारांची संख्या लाखोपर्यंत पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयचे २०१८ चे परिपत्रक रद्द केले होते. यामध्ये आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यास किंवा त्यासाठी वित्तपुरवठा करण्यास बंदी घातली होती.

पेट्रोल-डिझेल दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर
सीबीडीसी (CBDC) मध्ये काय असेल खास?
भारतीय रिझर्व्ह बँकेची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ही कायदेशीर निविदा असेल. सीबीटीसीमागे भारताच्या केंद्रीय बँकेचे पाठबळ असेल. हे सामान्य चलनासारखे पण डिजिटल स्वरूपात असेल. ज्याप्रमाणे लोक वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात चलन देतात, त्याच प्रकारे तुम्ही सीबीडीसीसह व्यवहार करू शकाल. फरक एवढाच असेल की, चलनी नोटांच्या तुलनेत ती डिजिटल स्वरूपात असेल.

इंडेक्स फंडात गुंतवणूक संधी; ‘एडलवाईज एएमसी’चा लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड खुला
सीबीसीडीची गरज का आहे?
यामागे तीन मुख्य कारणे आहेत. सेंट्रल बँकेच्या कागदी चलनापेक्षा सोपे स्वरूप, चलनाचे इलेक्ट्रिक स्वरूप लोकप्रिय, तसेच हे चलन जारी करणे किंवा त्यावर बंदी घालणे सोपे आहे. लोकांच्या डिजिटल चलनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेंट्रल बँकेला सीबीडीसी आणायचे आहे. देशात खाजगी आभासी चलनाचा (व्हर्चुअल करन्सी) वापर सातत्याने वाढत चालला आहे आणि खाजगी चलनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सीबीडीसी सुरू करण्यात येत आहे.

युरोपात करोनाची चौथी लाट; दोन दिवसांत सोनं ११०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
क्रिप्टो आणि सीबीडीसीमध्ये फरक
बिटकॉइनसारखे आभासी चलन डिजिटली एन्क्रिप्ट केलेले आहे. तसेच विकेंद्रित आणि कोणत्याही सरकारी किंवा सरकारी घटकाशी संलग्न नाही. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी ही सामान्य चलनाची डिजिटल आवृत्ती असेल, ज्याची सरकार हमी देईल. सीबीडीसी हे देशाच्या सेंट्रल बँकेचे सामान्य चलन आहे, तर क्रिप्टोकरन्सी स्वतंत्रपणे चालतात. सेंट्रल बँकेचे डिजिटल चलन हस्तांतरित करण्यासाठी मध्यस्थांची गरज लागणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: