Gautam Gambhir: ‘इसिस काश्मीर’कडून गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ


हायलाइट्स:

  • गौतम गंभीर माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार
  • धमकीचा मेल मिळाल्यानंतर खळबळ
  • दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची घेतली भेट

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना मंगळवारी एक धमकीचा मेल मिळाला आहे. या मेलद्वारे गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. ‘इसिस काश्मीर‘कडून गंभीर यांना ठार मारण्यात येईल, असा दावा या पत्राद्वारे करण्यात आलाय.

हा मेल मिळाल्यानंतर गौतम गंभीर यांनी बुधवारी रात्री मध्य दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांकडून मेलची चौकशी सुरू करण्यात आलीय.

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गौतम गंभीर चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना निशाण्यावर घेतलं होतं.

‘कृषी कायद्यांवरील अहवाल प्रसिद्ध करा’, समिती सदस्याची मागणी
bharat gaurav trains : आता ‘भारत गौरव’ ट्रेन धावणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा

सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला ‘मोठा भाऊ’ संबोधलं होतं. यावर, ‘अगोदर आपल्या मुलांना सीमेवर पाठवा त्यानंतर अशी वक्तव्य करा’ असे उपदेशाचे डोस गौतम गंभीर यांनी सिद्धूंना पाजले होते.

भारत गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध लढत आहे. सिद्धूंनी एका दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ म्हणणं ‘लज्जास्पद’ असल्याचं वक्तव्य गौतम गंभीर यांनी केलं होतं.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. दुहेरी मानदंडांसहीत राजकारण करण्याचा आरोप त्यांनी केजरीवाल यांच्यावर केला. तसंच ‘दिल्लीचे मुख्यमंत्री राम जन्मभूमी स्थळावर पूजा करून आपली पापं धुण्याचा प्रयत्न करत असल्याचं’ गंभीर यांनी म्हटलं होतं.

काही बाबतीत ‘एआयएमआयएम’ सारखे पक्ष केजरीवाल यांच्याहून बरे आहेत, कमीत कमी आपला धार्मिक अजेंडा आणि कामावर ते ठाम तरी आहेत, असं म्हणत गंभीर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम आणि केजरीवाल यांच्या ‘आप’ची तुलना केली होती.

sambit patra : भाजप प्रवक्ते संबित पात्रा अडचणीत, दिल्लीतील कोर्टाने दिले FIR दाखल करण्याचे आदेश
२६/११ हल्ला : …ही तर दुर्बलतेची निशाणी, काँग्रेस नेत्याचा मनमोहन सरकारवर वारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: