Shashikant Shinde: सातारच्या निकालाचे राष्ट्रवादीला हादरे; शशिकांत शिंदे यांचे भूकंपाचे संकेत!


हायलाइट्स:

  • शशिकांत शिंदे यांची शरद पवारांसोबत बंद दाराआड चर्चा.
  • साताऱ्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता.
  • शिंदे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार.

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पक्षाच्याच बंडखोराकडून धक्कादायकरित्या अवघ्या एका मताने पराभव झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेकीचीही घटना घडली. या सर्वाची गंभीर दखल घेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे दाखल होत सर्किट हाऊस येथे शशिकांत शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी पक्षात झालेली बंडखोरी, निवडणुकीचा अनपेक्षित निकाल व त्यानंतर उमटलेले पडसाद यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून बैठकीनंतर शिंदे यांनी अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे दिली आहे. ( Shashikant Shinde Latest News )

वाचा: शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांनी बोलावली बैठक; नेमकं काय घडलं?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आणि पुढील राजकीय वाटचाल याबाबत शशिकांत शिंदे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनीच संकते दिले आहेत. ‘मी २५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीबाबत मी बोलेन आणि माझी भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करेन’, असे शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबतची बैठक आटोपल्यानंतर माध्यमांना सांगितले. तुम्ही राष्ट्रवादीत राहून काम करणार आहात की पक्ष सोडणार आहात, असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक आहे आणि मरेपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे. असाही मी आता मोकळाच आहे, असा इशाराही त्यांनी जिल्ह्यातील विरोधकांना दिला.

वाचा:सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील पराभव शशिकांत शिंदेंच्या जिव्हारी, म्हणाले…

जिल्ह्याच्या राजकारणात मी ज्यांना अडसर वाटतो त्यांनी माझा पराभव केला आहे. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आज विश्वासघात केला आहे. सगळं काही व्यवस्थित आहे असं समजून आम्ही निर्धास्त आणि गाफील होतो त्याचाच फटका बसला, असे शिंदे म्हणाले. या पराभवाने खचून न जाता जावळी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा करणार, साताऱ्यात पक्ष भक्कम करणार, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

वाचा:सांगलीत भाजपला मोठा धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट घरचा रस्ताSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: