bharat gaurav trains : आता ‘भारत गौरव’ ट्रेन धावणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा


नवी दिल्लीः देशातील जनतेला चांगल्या प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन बदल करत असते. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. प्रवासी, मालवाहतूक विभागानंतर रेल्वे पर्यटनासाठी ‘भारत गौरव’ ट्रेन सुरू करणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतूक वर्टिकलनंतर त्यांनी रेल्वेच्या पर्यटन विभागाची घोषणा केली आहे आणि यासाठी सुमारे १९० ट्रेनची दिल्या गेल्या आहेत.

भारताची संस्कृती, वारसाचे दर्शन घडवणार

भारत गौरव ट्रेन भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील. भारत गौरव ट्रेन खासगी क्षेत्र आणि IRCTC या दोन्हींद्वारे चालविली जाऊ शकते आणि या ट्रेनचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल. रेल्वेकडून आजपासूनच अर्ज मागविण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. अशा उपक्रमांना आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भागधारक या ट्रेन्सचे नूतनीकरण करतील आणि त्या चालवतील. तर रेल्वेद्वारे या ट्रेन्सची देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधा पुरवल्या जातील, असे ते म्हणाले.

आपण याकडे नियमित रेल्वे सेवा म्हणून पाहत नाही आणि ही सामान्य रेल्वे सेवा नाही. ‘भारत गौरव’ ट्रेनचा मुख्य उद्देश भारतातील पर्यटनाला चालना देणे हा आहे आणि त्याला अनेक आयाम आहेत. असे ते म्हणाले.
cryptocurrency news : केंद्र क्रिप्टोकरन्सींवर विधेयक आणणार; बंदीच्या वृत्ताने क्रिप्टोकरन्सीत घसरण

आम्ही यासाठी अभ्यास केला आहे. आपण संस्कृतीच्या कोणत्याही पैलूबद्दल बोलतो तेव्हा त्यासाठी अनेक संवेदनशील गोष्टी असतात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून डिझायनिंग, खाणे-पिणे आणि कपडे घालणे यासारख्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला ते नक्कीच अंगीकारावे लागेल. या प्रक्रियेत आपल्याला शिकून पुढे जायचे आहे आणि या प्रक्रियेत कोणत्याही परिमाणाचा दगड नाही आणि गरज पडल्यास सुधारणेला नेहमीच वाव असेल, जेणेकरून आपण प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊ शकू, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

gas cylinder subsidy : चांगली बातमी! गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू, तुमच्या खात्यात आले का पैसे? असे बघा…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: