इंडेक्स फंडात गुंतवणूक संधी; ‘एडलवाईज एएमसी’चा लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड खुला


हायलाइट्स:

  • एकाच पोर्टफोलिओमध्ये लार्ज आणि मिडकॅप स्टॉक्सची समान सुविधा देणारा अशा प्रकारचा पहिला इंडेक्स फंड
  • ओपन -एंडेड इक्विटी योजना – निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्समध्ये
  • निफ्टी १०० इंडेक्स आणि १५० मिडकॅप स्टॉकमधील आघाडीच्या कंपन्यांमधील शंभर लार्जकॅप स्टॉकचे एकत्रीकरण

मुंबई : एडलवाईज ऍसेट मॅनेजमेंट या वेगाने वाढणार्‍या एएमसीने एडलवाईज लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड या ओपन – एंडेड इक्विटी योजनेची घोषणा केली. हा फंड म्हणजे निफ्टी लार्जमिडकॅप २५० इंडेक्सची प्रतिकृती आहे. या इंडेक्स फंडमध्ये लार्ज आणि मिडकॅप शेअरचे वाटप करता येणार असल्याने वृद्धी (मिडकॅप) आणि स्थिरता (लार्जकॅप) यांचा समतोल साधण्याची खात्री आहे.

युरोपात करोनाची चौथी लाट; दोन दिवसांत सोनं ११०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
या योजनेचा गुंतवणूक उद्देश आहे की, निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्समध्ये किरकोळ होणार्‍या चुका लक्षात घेऊन जास्तीत जास्त एकूण परतावा देणे आहे. या इंडेक्सला लार्ज ऍण्ड मिडकॅप आणि फ्लेक्सिकॅपच्या तुलनेत उत्तम कामगिरीचा रेकॉर्ड आहे. लार्जकॅप्स आणि मिडकॅप्सला समान भार दिल्याने कुठल्याही मार्केट कॅप विभागात होणारे नुकसान कमी होते आणि मिडकॅप स्टॉकमध्ये आश्वासक अर्थपूर्ण लाभ होतो. हा पहिला इंडेक्स फंड आहे, जो निफ्टी लार्जमिडकॅप २५० इंडेक्सवर लॉंच होत आहे.

पीएमसी बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी; अशी मिळणार भरपाई, RBI ने आराखडा केला सादर
एकाच पोर्टफोलिओमध्ये सक्रीय फंडस् पूरक असून हा फंड म्हणजे ‘डू इट यूव्हरसेल्फ’ (डीआयवाय) उपाय आहे आणि प्रथमच गुंतवणूक करणार्‍यांना त्यांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी उत्तम फंड आहे. हा फंड दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्‍यांसाठी मौल्यवान ठरणार आहे, असे, एडलवाईज ऍसेट मॅनेजमेंटच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी म्हटले आहे.

LIC च्या या योजनेनं व्हाल लखपती! दर महिन्याला गुंतवा फक्त ९०० रुपये,जाणून घ्या माहिती
दि एडलवाईज लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुला राहणार आहे. लया योजनेत कमीत कमी पाच हजार रु.ची गुंतवणूक करण्याची परवानगी देते आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत करता येणार आहे. गुंतवणूकदारांना उत्तम परताव्यासाठी ५ ते ७ वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यात नियमित आणि थेट योजना आहे. त्याचे व्यवस्थापन भावेश जैन करणार आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: