himachal pradesh bjp : भाजपमध्ये हुकूमशाही सुरू आहे… म्हणत हिमाचल प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा


धर्मशाळाः हिमाचल प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांच्या नावे फेसबुकवर पोस्ट केला आहे. “मी कृपाल परमार, उपाध्यक्ष, हिमाचल भाजप, पक्षाच्या पदाचा राजीनामा पाठवत आहे. कृपया ते स्वीकारा. याचे कारण मी स्वतंत्र पत्रात देईन, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

गेल्या ४ वर्षांपासून भाजपमध्ये त्यांची सातत्याने उपेक्षा केली जात आहे. आता हे फार काळ सहन करू शकत नाही. आपण पक्षाचा खरा कार्यकर्ता असून यापुढेही काम करत राहणार असल्याचे परमार यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी हे पत्र आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर विधानसभा मतदारसंघातून परमार यांच्या जागी पक्षाने बलदेव ठाकूर यांना उमेदवारी दिली होती.

‘अपमान सहन करू शकत नाही’

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी समजावल्यानंतर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली नाही. पण ते प्रचारापासून दूर राहिले. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या भवानी सिंह पठानिया यांनी बलदेव ठाकूर यांचा ५००० हून अधिक मतांनी पराभव झाला. या ना त्या मार्गाने आपला अपमान झाला. यापुढे हा अपमान सहन होत नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळेच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

परमार माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे निकटवर्ती

परमार हे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे अतिशय निकटवर्ती मानले जातात. परमार २००२ ते २००६ पर्यंत राज्यसभेचे खासदार होते आणि ते कांगडा येथील भाजपच्या बड्या नेत्यांपैकी एक मानले जातात. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या राजीनाम्यावर भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

sambit patra : भाजप प्रवक्ते संबित पात्रा अडचणीत, दिल्लीतील कोर्टाने दिले FIR दाखल करण्याचे आदेश

पक्षात हुकूमशाही सुरू: परमार

परमार हे अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर छुप्या पद्धतीने पक्षाविरोधात लिहित होते. ते मोठे पाऊल उचलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. ‘आपला आवाज कुठल्यातरी गोंगाटात गायब झाला. माझी शांतता दूरपर्यंत ऐकू येईल, असे त्यांनी म्हटले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पक्षात हुकूमशाही सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांचा अपमान होत आहे. कोअर कमिटीशी माझ्याही काही अडचणी होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पक्ष सोडलेलाच बरा, असे त्यांनी म्हटले होते.

tripura polls supreme court : ‘भाजप आमदाराने ‘तालिबान स्टाइल’मध्ये हिंसा करण्याचे भाषण दिले होते का?’, सुप्रीम कोर्टाचा सवालSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: