Madhya Pradesh: धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ काढण्यासाठी स्टंटबाजी महागात, व्हिडिओ व्हायरल


हायलाइट्स:

  • सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल
  • धावत्या रेल्वेसोबत स्टंटबाजी
  • २२ वर्षीय तरुणानं नाहक गमावला जीव

होशंगाबाद, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये धावत्या रेल्वेसमोर स्टंटबाजी करणं एका तरुणाला भलतंच महागात पडलंय. धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ शुटींग करण्याच्या प्रयत्नात तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ शूट करण्याची या तरुणाला इच्छा होती. मात्र, या दरम्यान रेल्वेचा जोरदार धक्का लागल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संजू चौरे नावाचा हा मृत तरुण २२ वर्षांचा होता.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ दिसून येतोय. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ – नागपूर रेल्वे लाईनवर इटारसीनजिकच्या पाजरा गावात राहणारा संजू चौररे आपल्या एका मित्रासोबत फिरायला म्हणून घराबाहेर पडला होता. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मालगाडीसोबत व्हिडिओ शूट करण्याची इच्छा त्यानं मित्राजवळ व्यक्त केली. संजू धावत्या मालगाडीसोबत धावत येणार आणि मित्र हा व्हिडिओ शूट करणार असंही ठरलं.

२६/११ हल्ला : …ही तर दुर्बलतेची निशाणी, काँग्रेस नेत्याचा मनमोहन सरकारवर वार
Mamata Benerjee: ममता बॅनर्जी आज सोनियांच्या भेटीला? पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट
मात्र, व्हिडिओ शुटींग सुरू असतानाच अत्यंत वेगात येणाऱ्या मालगाडीच्या रुळाच्या बाजुला उभ्या असलेल्या संजूचा तोल गेला आणि त्याला धावत्या मालगाडीचा जोरदार धक्का बसला आणि तो रेल्वे रुळाच्या बाजुला फेकला गेला. गंभीर जखमी झालेल्या संजूला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पथरौटा स्टेशन प्रभारी नागेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.

ramayan express : रामायण एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस बदलला, संतांच्या इशाऱ्यानंतर रेल्वेचा निर्णय
prakash jadhav award kirti chakra : अभिमानाने उर भरून येईल असा पराक्रम… प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्तीचक्रSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: