IND V NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी…


कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या सलग तिसऱ्या सामन्यातही रोहित शर्माने नाणेफेक जिंकली. रोहितने गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण या सामन्यात मात्र नाणेफेक जिंकल्यावर रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यासाठी लोकेश राहुल आणि आर. अश्विन यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या जागी भारतीय संघात इशान किशनला संधी देण्यात आली आहे, तर अश्विनच्या जागी संघात युजवेंद्र चहलचे पुरनागमन झाले आहे.

भारताने रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघात प्रयोग करण्याची नामी संधी आहे. कारण भारतीय संघात बरेच युवा खेळाडू आहेत आणि त्यांना संधी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे म्हटले जात आहे. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऋतुराजने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही ऋतुराजने दिमाखदार कामगिरी केली होती. त्यामुळे ऋतुराज चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ऋतुराजला संधी मिळू शकते, असे म्हटले जात होते. पण ऋतुराजला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणाला बाहेर बसवायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे नक्कीच असेल. ऋतुराजबरोबरच वेगवान गोलंदाज अवेश खानही भारतीय संघात सामील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कारण अवेशने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे या सामन्यात भुवनेश्वर कुमारऐवजी अवेशला संघात स्थान दिले जाऊ शकते, असे म्हटले जात होते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघातून जखमी झालेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती. सिराजच्या जागी भारतीय संघात आयपीेल गाजवणाऱ्या हर्षल पटेलला संधी देण्यात आली होती. हर्षलने या सामन्यात पदार्पण करताना संधीचे सोने केले. कारण हर्षलने महत्वाच्या विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या धावसंख्येवर वचक ठेवण्याचे काम चोख बजावले होते. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: