मुकेश अंबानी घेणार मोठा निर्णय; नवीन कंपनी स्थापन करण्याच्या हलचाली


मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजपासून ओटूसी (O2C) व्यवसाय वेगळे करण्याचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजने मागे घेतला आहे. तेल ते केमिकल व्यवसाय वेगळा करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने एनसीएलटीसमोर अर्ज दाखल केला होता. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा ओटूसी (O2C) व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे भागीदार सौदी अरामकोला कळविण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. जर नवीन कंपनी स्थापन झाली, तर तिला सौदी अरामकोला हिस्सा विकावा लागेल. सौदी अरामकोसोबत भारतात गुंतवणूक करण्यास नेहमीच उत्सुक असेल, असेही रिलायन्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वाचा- मोदी सरकारद्वारे मेगा विक्री: या ६ कंपन्या लवकरच विकल्या जाणार

सौदी अरेबियात गुंतवणूक करणार
सौदी अरेबियात गुंतवणुकीसाठी तेथील सरकारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनीला सहकार्य करणार असल्याचेही रिलायन्सने सांगितले. रिलायन्सने जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीत रिलायन्स आणि सौदी अरामको यांनी मिळून निर्णय घेतला आहे की, ओटूसी व्यवसाय आरआयएल (RIL) पासून वेगळा केला जाणार नाही.

वाचा- केंद्र घेणार मोठा निर्णय; आयकर कायद्यात बदलासाठी हालचाली,क्रिप्टोकरन्सीवर लागणार…

रिलायन्स विकणार २० टक्के हिस्सा

रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये, कंपनीने सौदी अरामकोसोबत १५ अब्ज डॉलरचा करार केला. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार आहे. या करारांतर्गत, रिलायन्स ऑइल केमिकल व्यवसायातील २० टक्के हिस्सा अरामकोला विकणार आहे. हा करार मार्च २०२० पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता, पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला आहे.

वाचा- महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय; परदेशी स्कॉच व्हिस्की झाली…

दरम्यान, या वर्षी जूनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सौदी अरामकोचे प्रमुख यासिर ओथमान अल-रुमायान यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. अरामकोसोबतचा करार यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: