आज मोडला जाणार विराट कोहलीचा महाविक्रम; या खेळाडूकडे आहे संधी


रांची: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना थोड्याच वेळात रांची येथे सुरू होणार आहे. या सामन्यात विजय मिळून रोहित शर्मा मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर पाच विकेटनी विजय मिळवला होता.

वाचा- पुजारा, तुझी आणि कुटुंबीयांची माफी मागतो; इंग्लंडच्या क्रिकेटपटूने हात जोडले

रांचीत होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात असा एक विक्रम मोडला जाणार आहे जो गेल्या काही काळापासून भारताच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्याची संधी एका भारतीय नव्हे तर न्यूझीलंडच्या खेळाडूला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल यांच्यावर सर्वांची नजर असेल. या सामन्यात त्याने फक्त ११ धावा केल्या तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. या बाबत तो विराट कोहलीला मागे टाकू शकतो. ज्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

वाचा- पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची इज्जत गेली; कर्णधारने केला मोठा कांड, द्यावा लागला राजीनामा

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ९५ सामन्यातील ८७ डावात ५२.०४च्या सरासरीने ३ हजार २२७ धावा केल्या आहेत. यात २९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर गुप्टिलने ११० सामन्यात ३२.४९च्या सरासरीने ३ हजार २१७ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतक आणि १९ अर्धशतक झळकावली आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ११७ सामन्यात ३२.८२च्या सरासरीने ३ हजार ०८६ धावा केल्या आहेत. रोहितने ४ शतक आणि २४ अर्धशतक केली आहेत. गुप्टिलने पहिल्या सामन्यात ४२ चेंडूत ७० धावा केल्या होत्या. टी-२० मधील भारताविरुद्धचे हे त्याचे पहिले अर्धशतक होते.

वाचा- Rohit Sharma: फक्त एक षटकार आणि हिटमॅन क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: