शेअर बाजारात घसरण ; सेन्सेक्स – निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक


हायलाइट्स:

  • सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
  • आज मंगळवारी सेन्सेक्स २५० अंकांनी आणि निफ्टी ४० अंकांनी घसरला आहे.
  • ऑटो क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात विक्रीचा दबाव आहे.

मुंबई : भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. महागाईचा पारा चढत असल्याने नजीकच्या काळात विकासात बाधा निर्माण होईल या भीतीने गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. आज मंगळवारी सेन्सेक्स २५० अंकांनी आणि निफ्टी ४० अंकांनी घसरला आहे.

फंडांचा फंडा ; जोखीम निश्चित करणारी गुणोत्तरे
आजच्या सत्रात ऑटो क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात विक्रीचा दबाव आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १८ शेअर घसरले आहेत तर १२ शेअरमध्ये वाढ झाली आहे. यात एल अँड टी, मारुती, सन फार्मा, टेक महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला एनटीपीसी, नेस्ले, टायटन, आयटीसी, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डी लॅब, ऍक्सिस बँक, कोटक बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

टेस्लाचे शेअर्स घसरले; एलन मस्क यांनी पुन्हा विकले करोडो रुपयांचे शेअर्स
वाहन उद्योगातील टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टीव्हीएस मोटर्स, महिंद्रा , हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली आहे.सध्या सेन्सेक्स २४४ अंकांनी घसरला असून तो ६०४७३ अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२ अंकाच्या घसरणीसह १८०४६ अंकावर आहे. सध्या टीव्ही टुडे १९ टक्के, व्हीएसटी टिलर्स १० टक्के, एनआयआयटी ८ टक्के आणि राजेश एक्स्पोर्ट ७ टक्के वाढले आहे. त्याशिवाय टाटा पॉवर, आयआरसीटीसी, येस बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

कॉर्पोरेट वादावर तोडगा; सेबीचे माजी अध्यक्ष एम. दामोदरन यांनी सांगितला हा पर्याय
सेन्सेक्सने कालच्या सत्रात सोमवारी ६१ हजारांना गवसणी घातली होती. मात्र बाजार बंद होताना तो ३२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६०७१८ अंकावर बंद झाला होता. कालच्या इंट्राडेमध्ये सेन्सेक्सने ४०० अंकाची झेप घेतली होती. शेअर बाजाराच्या माहितीनुसार सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४२५ कोटीचे शेअर खरेदी केले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: