हार्दिक पंड्याचे ग्रह फिरले, भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी बीसीसीआयने ठेवली मोठी अट…


नवी दिल्ली : भारताला अष्टपैलू खेळाडू हवा असेल, तर माझ्या भावला निवडा, असा तोरा एकेकाळी हार्दिक पंड्याने दाखवला होता. पण आता हार्दिक पंड्याचे ग्रहच फिरल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिकची निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर हार्दिकला आता भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी बीसीसीआयने एक मोठी अट घातली आहे.

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून हार्दिक हा सातत्याने गोलंदाजी करत नव्हता. भारतीय संघात हार्दिक फक्त फलंदाज म्हणून असला तरी त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. तरीही हार्दिकला विश्वचषकातील सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. पण हार्दिकला विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच त्याला आता भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता हार्दिकला पुनरागमनाचा मार्ग सोपा नसल्याचेही पाहायला मिळत आहे. कारण त्यासाठी बीसीसीआयने एक मोठी अट ठेवली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, हार्दिकला निवड समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की, “हार्दिकला आता आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. त्यासाठी हार्दिकला पूर्णपणे फिट झाल्यावर स्थानिक सामने खेळावे लागतील. स्थानिक सामन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली तर त्याला आता भारतीय संघात संधी मिळणार आहे.” दुसरीकडे भारतीय संघाला वेंकटेश अय्यरच्या रुपात हार्दिकसाठी चांगला पर्याय मिळाल्याचे म्हटले जात आहे. कारण वेंकटेश हा धडाकेबाज सलामीवीर आहे, त्याचबरोबर तो चांगली गोलंदाजीही करतो. त्यामुळे तो हार्दिकसाठी तो आता एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे जोपर्यंत हार्दिक पूर्णपणे फिट झाल्यावर आपला फॉर्म सिद्ध करेल तोपर्यंत वेंकटेश संघात स्थिरस्थावर होऊ शकतो. त्यामुळे आता हार्दिकसाठी भारतीय संघात पुनरागमन करणे सोपे नसेल. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये आयपीएलचा लिलावही होणार आहे. या लिलावापर्यंत जर हार्दिक भारतीय संघात आला तर त्याला चांगला भाव मिळू शकतो, अन्यथा त्याच्या करीअरला मोठा धक्का बसू शकतो.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: