T 20 World Cup : मोइन अलीने दिला न्यूझीलंडला दणका, उपांत्य फेरीत इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर…


आबुधाबी : मोईन अलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत आपले अर्धशतक साकारले. मोइन अलीच्या अर्धशकाच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडपुढे मोठे आव्हान ठेवता आले. मोइन अलीने यावेळी ३७ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच इंग्लंडला न्यूझीलंडपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवता आले.

न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यावेळी इंग्लंडच्या धावसंख्येवर अंकुश ठेवत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना ५३ धावांमध्ये तंबूत धाडले. पण त्यानंतर इंग्लंडच्या डेव्हिड मलानने धडाकेबाज फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज टीम साऊथीने यावेळी मलानला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. मलानने यावेळी ३० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ४१ धावांची खेळी साकारली.

डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या मोइन अलीने संघाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकांमध्ये मोईनने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या सामन्यात मोइनने इंग्लंडसाठी सर्वाधिक धावाही केल्या.

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी सुरुवातील चांगला मारा केला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये इंग्लंडला मोठे फटकेबाजी करण्यापासून रोखले. टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांपेक्षा अॅडम मिल्ने हा जास्त प्रभावी ठरल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यसमनने यावेळी फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांवर जास्त भर दिल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर त्यांनी भारतावर विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंडने एकामागून एक विजय मिळवत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील २०१९ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या मनात ताज्या असल्याचे पाहायला मिळाले. कारण चाहत्यांनी सोशल मीडियावर या सामन्याचे फोटो आणि आठवणी पोस्ट केल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: