priyanka gandhi : प्रियांका गांधींची घोषणा… ‘आशा, अंगणवाडी सेविकांना दरमहा १० हजार रुपये मानधन देणार’


लखनऊः उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अॅक्शनमध्ये आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या जनतेला आकर्षित करण्यासाठी सतत मोठमोठी आश्वासने देत आहेत. आता प्रियांका गांधी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांना मोठं आश्वासन दिलं आहे. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यास आशा आणि अंगणवाडी सेविकांना दरमहा १० हजार रुपये मानधन देण्याचं आश्वासन देत प्रियांका गांधींनी मोठी घोषणा केली आहे.

आशा भगिनींच्या मानधनासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून सरकार आल्यास आशा भगिनी आणि अंगणवाडी सेविकांना दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येईल, असं ट्विट प्रियांका गांधींनी केलं आहे.

यूपी सरकारने आशा भगिनींवर केलेल्या हल्ला हा त्यांच्या कामाचा अपमान आहे. आशा भगिनींनी करोना आणि इतर प्रसंगी आपली सेवा तत्परतेने दिली आहे. मानधन हा त्यांचा हक्क आहे. त्यांचे म्हणणे ऐकणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आशा भगिनी आदरास पात्र आहेत आणि या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे, असं प्रियांका गांधी यापूर्वी ट्विट केलेल्या एका व्हिडिओत म्हटलं आहे.

channi sidhu : सिद्धूंपुढे झुकले पंजाबचे मुख्यमंत्री! अखेर देओल यांचा राजीनामा स्वीकारला

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. प्रियांका गांधी यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के जागांवर महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेऊन प्रवक्ते आणि समन्वयक नेमले जातील. विशेष म्हणजे काँग्रेससोबत येऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती या परीक्षेला बसू शकते. तरुणांना प्राधान्य दिले जाईल, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

kcr – arvind dharmapuri : ‘मुख्यमंत्री केसीआर यांचे राजकीय मरण जवळ, त्यांनी मोदींशी पंगा घेतला’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: