सरकारवर आरोप करत एसटी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरात खळबळ


म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

राज्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत (MSRTC Workers Strike) सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याचा आरोप करत कोल्हापूर विभागातील एका एस. टी. कर्मचाऱ्याने आगारातच गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सदानंद सखाराम कांबळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी दोन दिवसापासून संपात उतरले आहेत. सकाळी कोल्हापूर बस स्थानकात गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद कांबळे यांने रुमालाचा वापर करत गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वाचा: एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगारांपुढे हात जोडले!

सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याने निराश झालेल्या कांबळे याने हे पाऊल उचलले. कर्मचाऱ्यांच्या विश्रांती कक्षात अचानक त्याने आत्महत्येचा हा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यास वाचवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे, पण दुसरीकडे संपावर कर्मचारी संघटना ठाम आहेत. यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

वाचा: एसटी महामंडळानं दाखल केलेल्या अवमान याचिकेवर हायकोर्टाचा ‘हा’ आदेशSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: