अनोखी शक्कल वापरत कोल्हापुरातील व्यापाऱ्याला तब्बल १० लाख रुपयांना घातला गंडा


हायलाइट्स:

  • कोल्हापुरातील धान्य व्यापाऱ्याची मोठी फसवणूक
  • भामट्याने जवळपास १० लाख रुपयांचा गंडा घातला
  • शाहूपुरी पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू

कोल्हापूर : हलदीराम फूडस् लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीच्या उत्पादनांची डिस्ट्रिब्युटरशीप देत आहे, असं सांगून विश्वास संपादन केल्यानंतर कोल्हापुरातील धान्य व्यापाऱ्याला एका भामट्याने जवळपास १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. संबधित व्यापाऱ्याने नेट बँकिंगवर व्यवहार केला असून शाहूपुरी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

मार्केट यार्ड येथील धान्य व्यापारी प्रकाशलाल मोहनलाल माखिजानी (वय ५०, रा. कारंडे मळा, कदमवाडी ) यांचे केमसन्स ट्रेडर्स हे धान्य विक्रीचे होलसेल दुकान आहे. त्यांना एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून हलदीराम फूडस लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीतून बोलत आहे, असं सांगितले. कंपनी आपणास डिस्ट्रिब्युटरशीप देत असून त्यांनी माखीजानी यांचा विश्वास संपादन केला.

‘तुमचा पती जिवंत आहे’; अंत्यसंस्कार केल्यानंतर रुग्णालयातून आला फोन!

माखिजानी यांनी दोन दिवसात कंपनी रजिस्ट्रेशन, सिक्युरिटी अॅग्रीमेंट, मटेरियल ऑर्डर यासाठी त्यांच्या बँक अकाऊंटवरुन संशयिताच्या पंजाब नॅशनल बँकेच्या अकाऊंटवर १० लाख २५ हजार रुपये नेट बँकिंगद्वारे ट्रान्सफर करुन दिले. माखीजानी यांनी रक्कम वर्ग केल्यानंतर माल पाठवण्यास सांगितल्यानंतर माल आणि डिस्ट्रिब्युरशीप न देता इन्शुरन्सकरिता तीन लाखाची मागणी करुन फसवणूक करण्यात आली. त्यानंतर माखीजानी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: