kcr – arvind dharmapuri : ‘मुख्यमंत्री केसीआर यांचे राजकीय मरण जवळ, त्यांनी मोदींशी पंगा घेतला’


हैदराबादः तेलंगणमधील निजामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. केसीआर यांचा राजकीय मृत्यू जवळ आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पंगा घेत आहेत, असे धर्मपुरी म्हणाले.

गिधाडा मृत्यू येतो तेव्हा ते शहराच्या दिशेने धावते. तसंच तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आहे. केसीआर यांचा राजकीय मृत्यू निकट आहे, ते मोदींशी ‘पंगा’ घेत आहेत आणि मोदी सरकारविरोधात खोटी वक्तव्ये करत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अरविंद धर्मपुरी यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपला पाठिंबा दिला नाही की भाजपचे नेते आपल्याला देशद्रोही म्हणतात, असे केसीआर म्हणाले होते.

Telangana: बेजबाबदार वक्तव्य टाळा अन्यथा जीभ कापून टाकू; मुख्यमंत्री भाजप नेत्यावर भडकले

farmers protest news : शेतकऱ्यांचा एल्गार! मुंबईत होणार भव्य महापंचायत, संसदेलाही घेरणार

केंद्र सरकार राज्याचा उकडा तांदूळ विकत घेणार की नाही? असा सवाल मुख्यमंत्री केसीआर यांनी केला होता. मुख्यमंत्री केसीआर यांच्या या वक्तव्यावर अरविंद धर्मपुरी यांनी त्यांच्याविरोधात हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषद घेऊन अरविंद धर्मपुरी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्याविरोधात हे वक्तव्य केले.

‘राम’ नावाचं राजकारण : ‘राम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हे…’ भाजप सहकारी निषाद यांचा दावाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: