न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, ऋतुराज गायकवाडला मिळाली संधी…


नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी आजा भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीच संघाची निवड पाहून आता चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या संघात विराट कोहलीला स्थान देण्यात आलेले नाही, तर भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माला मिळाले आहे. त्याचबरोबर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान मिळालेआहे.

भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आव्हेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

विश्वचषकात भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही. त्याचबरोबर विराट कोहलीनेही भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत कोणाला कर्णधारपद मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्याचबरोबर भारतीय संघातील काही खेळाडू बऱ्याच दिवसांपासून बायो-बबलमध्ये आहेत, त्यांना आप्तस्वकियांनाही भेटता आलेले नाही. त्यामुळे त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय या मालिकेत घेण्यात येणार होता. त्यानुसार या मालिकेसाठी बीसीसीआयने संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी गेला होता. या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाची इंग्लंडबरोबर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी दाखल झाला. आयपीएल संपते न संपते तोच ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही. त्याचबरोबर बायो-बबलमध्ये सतत राहून खेळाडूंचे मानसीक स्वास्थ बिघडू शकते. त्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याचबरोबर विराट कोहली कसोटी मालिकेतही खेळणार नसल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे रोहितकडे ट्वेन्टी-२० बरोबरच भारताच्या कसोटी संघाचेही नेतृत्व दिले जाऊ शकते, असे क्रिकेट वर्तुळात म्हटले जात होते. जर असे झाले तर भारतीय क्रिकेटमध्ये आता रोहितपर्व सुरु होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे विराट कोहलीचे नेमके काय होणार, याचीही चिंता त्याच्या चाहत्यांना आहे. कारण आता विराटकडून कोणते कर्णधारपद नेमके राहणार आहे, हेच त्याच्या चाहत्यांना समजत नाहीए.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: