धक्कादायक! जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या


हायलाइट्स:

  • जळगावात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या.
  • नैराश्यापोटी दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास.
  • पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना आज मंगळवारी समोर आल्या आहेत. यात जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथिल ६२ वर्षीय तर पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथिल २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. (Two farmers in Jalgaon district committed suicide)

जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे पहिल्या घटनेत माधवराव श्रावण कुंभार (वय ६२) य वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. माधवराव कुंभार हे गावात कुंभार व्यवसाय करीत होते. तसेच त्यांची शेती असून त्यात देखील ते काम करीत असत. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. माधवराव यांच्या पश्चात पत्न, १ मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- जळगावात नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; ‘हे’ कारण

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथिल तरुण शेतकरी राहुल राजेंद्र पाटील (वय २६) याने कपाशीचे अपेक्षित उत्पन्न न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली. राहुल पाटील यांनी वडीलांकडूनच पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली होती. त्यात कपाशीचे पीक लावले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे पिक वाया गेले. केलेला खर्च देखील मिळाला नाही.

क्लिक करा आणि वाचा- ईडी,सीबीआय की एनआयए?; फडणवीस मलिकांविरोधातले पुरावे कोणाला देणार?

ही परिस्थिती उद्भवल्यानंतर आता वडीलांना पैसे कसे द्यायचे घर कसे चालवायचे अशा विवंचनेतून त्यांना नैराश्य आले होते. त्यातून त्यांनी शेतातीलच शेड मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. राहुल पाटील यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, अडीच वर्षाची मुलगी व भाऊ असा परीवार आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘फडणवीस राईचा पर्वत बनवत आहेत, ‘असा’ झाला मालमत्तेचा व्यवहार’; मलिकांनी केले स्पष्टSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: