जाता जाता रवी शास्त्रींनी पराभवाचे खापर यांच्या डोक्यावर फोडले


नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला. भारताने टी-२० वर्ल्डकपमधील अखेरची लढत जिंकली पण त्याचे आव्हान त्याआधीच संपुष्टात आले. या लढती सोबत भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली आणि रवी शास्त्री हे पर्व संपले. विराटचा टी-२०चा कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना होता. तर शास्त्रींचा प्रशिक्षक म्हणून कालावधी संपला आहे.

वाचा- आळशी म्हणणाऱ्यांना रोहित शर्माने दिले सडेतोड उत्तर; टी-२०मध्ये केला हा विक्रम

भारताने नामिबियावर ९ विकेटनी विजय मिळवला. या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये रवी शास्त्री यांनी खेळाडूंशी संवाद साधला. शास्त्री यांनी जाता जाता टी-२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीसाठी बीसीसीआयला जबाबदार धरले. सामना सुरू होण्याच्या आधी शास्त्री म्हणाले की, मी मानसिक पातळीवर थकलो आहे. माझ्या वयात असे होणे शक्य आहे. पण भारतीय संघातील खेळाडू देखील मानसिक आणि शारिरिक पातळीवर थकले आहेत. खेळाडू सहा महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. आम्हाला आयपीएल आणि वर्ल्डकपमध्ये मोठे अंतर हवे होते. जेव्हा मोठे सामने असतात तेव्हा थकव्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नाही. हे कोणतेही कारण नाही. शास्त्री यांनी बीसीसीआयचे नाव घेतले नसले तरी त्यांनी इशाऱ्यात टी-२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीला बोर्डाला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; या खेळाडूने सलग ४ षटकात केली ऐतिहासिक कामगिरी

प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना झाल्यानंतर शास्त्रींनी बीसीसीआयला अलर्ट केले. काही खेळाडू गेल्या सहा महिन्यात फक्त २५ दिवस घरी गेले आहेत. काही खेळाडू असे आहेत जे तीन फॉर्मेटमध्ये खेळतात. तुम्ही डॉन ब्रॅडमन देखील असला तरी तुमची सरासरी खाली घसरेल. यामुळेच अलर्ट रहा बायो बबल कधीही फुटू शकतो. आम्ही पराभव स्विकार करतो. कारण आम्ही पराभवाला घाबरत नाही. वर्ल्डकपमध्ये आम्ही विजयासाठी प्रयत्न केला नाही कारण त्यासाठी आवश्यक एक्स फॅक्टर गायब होता. शास्त्रींच्या आधी गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी देखील खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

वाचा- ही आहेत ती दोन नावे ज्यांच्यामुळे भारताला ICCचे विजेतेपद मिळवता आले नाही

प्रशिक्षक म्हणून शास्त्री स्वत:च्या कार्यकाळावर खुश आहेत. जगभरातील सर्व देशात कसोटी सामन्यात विजय मिळवणे हे माझ्यासाठी खास होते. वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथे आम्ही चांगली कामगिरी केली. मजबूत संघांच्या विरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर विजय मिळवला. आम्हाला नेहमी घरातील वाघ म्हटले जायचे. पण यावेळी आम्ही बाहेर जाऊन विजय मिळवला. भारताचे नवे कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. पुढील ३-४ वर्ष फार महत्त्वाची आहेत. विराट अद्याप संघात आहे आणि कर्णधार म्हणून त्याची कामगिरी शानदार ठरली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: