एसटी कर्मचाऱ्यांचा संप; गैरसोय टाळण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय


हायलाइट्स:

  • राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या बस सेवा ठप्प
  • राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
  • अन्य वाहनांनाही प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या बस सेवा ठप्प आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिणीकरण करण्यात यावं या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने आता अन्य वाहनांनाही प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. शासनाचा नवा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून लागू असणार आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर हा निर्णय रद्द होईल, असंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

‘जिल्हा रुग्णालय आग’प्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई; उचलले ‘हे’ कठोर पाऊल

कोणत्या वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी?

शालेय बस, कंपनीच्या बस आणि खासगी बससह मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तब्बल २०-२५ हजार बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार होणार आहेत.

दरम्यान, ही परवानगी तात्पुरती असल्याचं शासनाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: