पी.व्ही. सिंधूला पद्मभूषण; ७ खेळाडूंचा राष्ट्रपतींनी केला गौरव


नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (८ नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरीत करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारताची सर्वात यशस्वी महिला बॉक्सर मेरी कोम हिला पद्मविभूषण २०२० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे.

वाचा- अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताने घेतला मोठा निर्णय; संघ व्यवस्थापनाने रद्द केला…

यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्येही रौप्य पदक जिंकले होते. एकेरी स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि एकूण दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानला पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले. झहीर खानची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्वाचा भाग होता. त्याने त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेटही घेतल्या होत्या.

वाचा- विराट कोहलीच्या त्या एका चुकीने भारताचा घात झाला; अन्य संघ जिंकत होते आणि…

मणिपूरची फुटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यात बेंबिम देवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारताचे माजी हॉकीपटू एम.पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते भाग होते.

वाचा- IPL का खेळला मग? बीसीसीआयने कोहली अँड कंपनीला फटकारले

भारतातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक जितू रायलाही पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे.

वाचा- शोएब अख्तरला बसला १० कोटी दणका; Live टीव्ही शोमध्ये केला होता राडा

भारतीय तिरंदाज तरुणदीप राय यालाही पद्मश्री पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. तरुणदीप रायनेही देशासाठी चांगले यश मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २००६ मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते. या खेळांमध्ये सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकण्यात त्याला यश आले आहे.

पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचाही समावेश आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या नेतृत्वात यंदा भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: