युरोपात महाराष्ट्र गौरव! हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी मिळाला पुरस्कार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थिती


हायलाइट्स:

  • हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी COP26 या जागतिक व्यासपीठाकडून प्रयत्न करतात.
  • महाराष्ट्र राज्याने पर्यावरण आणि हवामान बदल नियंत्रणाबाबत केलेल्या प्रयत्नांची या परिषदेने दखल घेतली.
  • COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership या पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • या परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्कॉटलंड : झपाटयाने वाढणाऱ्या हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणाऱ्या COP26 या जागतिक व्यासपीठाने महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership या पुरस्काराने गौरवण्यात आले. या परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
महाराष्ट्र सरकारने पर्यावरणीय बदल आणि ते रोखण्यासाठी केलेल्या विविध भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची COP26 परिषदेने विशेष दखल घेतली. COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशा भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या. या परिषदेला उपस्थित राहून ठाकरे यांनी राज्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

नोटाबंदीची पाच वर्षे : डिजिटल पेमेंटमध्ये झाली वाढ, वाचा काय सांगतो विशेष अहवाल
शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान आहे असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले.

जोडोनिया कर; प्राप्तिकर नोटिसा : माहितीही… दखलही
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनीच हरित भविष्य पाहण्याची प्रेरणा दिली आहे. माय प्लॅनेट अशी चळवळ आम्ही सुरु केली असून निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष देत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: