अर्थसंवाद, जादूचा दिवा ; इंधनदर बदलानंतरची शेअर बाजारातील गुंतवणूक


केदार ओक, मुंबई : लक्ष्मीपूजन यंदा बाजाराने जोरदार साजरे केले. खास मुहूर्ताच्या सौद्यांच्या दिवशी बाजार सकारात्मक स्तरावर बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १७,९१६ (+८७) आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६०,०६७ (+२९५) बंद झाला. वेडेवाकडे वाढलेले समभाग थोडे खाली येताना दिसत असून ते आता कंपनीच्या प्रत्यक्ष कामगिरीशी जुळते होत आहेत. याला निर्देशांक आणि ‘प्राईस अॅडजस्टमेन्ट’ म्हणतात .

बंपर कमाईची संधी; या आठवड्यात उघडणार ‘पेटीएम’सह दोन कंपन्यांचे आयपीओ
आता या आठवड्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे गेले कित्येक दिवस होत असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अचानक उत्पादन शुल्कात कपात करून पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल नऊ रुपयांनी स्वस्त केले. त्याला राजकीय रंग देण्याचा नेहमीप्रमाणे प्रयन्त झाला, पण खरं कारण वेगळेच आहे. वाढत जाणारे दैनंदिन गोष्टींचे भाव आणि त्यामुळे वाढणारा महागाईचा दर हे दोन्ही अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहेत. ते जर सांभाळू शकलो नाही, तर व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेला वाढवावे लागतील. ते या मोठ्या करोना संकटातून बाहेर पडत असताना योग्य नाही. व्याजदर कमी राहणे आत्ताच्या घडीला महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने कमी झालेल्या किंमतीमुळे ज्या कंपन्यांना फायदा होईल त्या म्हणजे वाहने, वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, रंग उद्योग, विमान उद्योग आणि थोड्याफार प्रमाणात पेट्रोल विक्री करणाऱ्या कंपन्या. काही कंपनी इथे सुचवत आहे. सोबतचा तक्ता पाहावा.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
अर्थात गेल्या काही दिवसांत काही समभाग खूप वाढलेले आहेत. त्यामुळे करेक्शनमध्ये यात गुंतवणूक करावी आणि अर्थात अशी गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत अवश्य घ्यावी.

त्याचबरोबर येत्या आठवड्यात खूप मोठे मोठे समभाग विक्रीसाठी बाजारात येणार आहेत. त्यांचे बाजारमूल्य बघता एक गोष्ट लक्षात घ्यावी की, एवढे मूल्यांकन या कंपन्यांचे खरंच आहे का? अर्थात त्यांना मिळणारा प्रतिसाद एवढे जगास दाखवून देईल की, भारतीयांकडे किती पैसा आहे! कारण भागविक्रीच्या साधारण १० टक्केच गुंतवणूक साधारण गुंतवणूकदार करू शकतो. एवढे मात्र खरे आपली गुंतवणूकक्षमता नक्की वाढली आहे.

नोटाबंदीची पाच वर्षे : डिजिटल पेमेंटमध्ये झाली वाढ, वाचा काय सांगतो विशेष अहवाल
इंधनदराचा परिणाम झालेल्या परंतु गुंतवणूकयोग्य असलेल्या कंपन्यांची माहिती सोबतच्या तक्त्यात दिल्यानंतर आता या आठवड्यात येणाऱ्या काही आयपीओंकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. कोणतीही भांडवली गुंतवणूक केल्यावर त्यापासून होणाऱ्या नफ्यातोट्याला गुंतवणूकदारच सर्वस्वी जबाबदार असतो. त्यामुळे गुंतवणूक पूर्ण अभ्यास करून, स्वतःच्या जबाबदारीवरच करावी.

इंधनदराचा परिणाम झालेल्या निवडक कंपन्या (आकडे रुपयांत)

कंपनीचे नावसध्याचा भाव५२ आठवडे कमाल/किमान
एप्कोटेक्स३९५४५७ / १३६
इंडिगो पेन्ट्स२,३५०३,३२९ / २,२२०
महिंद्र अँड महिंद्र८७२९७१/५८९
इंडिगो एअरलाइन्स२,१७०२,३०७ / १,२८५
पेट्रोनेट२३२२७५ / २११

या सप्ताहातील आयपीओ

कंपनीखुलाबंदलॉट (भागसंख्या)इश्यूइश्यू
लेटन्ट व्ह्यू अनालिटिक्स लिमिटेड१० नोव्हेंबर २०२११२ नोव्हेंबर २०२१७६१९० ते १९७६००
सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड९ नोव्हेंबर २०२१११ नोव्हेंबर २०२११२ १,१२० ते १,१८०२,०७३.३०
वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड८ नोव्हेंबर २०२११० नोव्हेंबर २०२१२,०८० ते २,१५०१८,३००Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: