AFG vs NZ : अफगाणिस्तानला चमत्कार करता आला नाही, भारताचे आव्हान संपुष्टात


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. न्यूझीलंडच्या या विजयासोबतच भारताचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला असता तरच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी होती. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाचे आव्हान ग्रुप फेरीत संपुष्टात आले. गेल्या वेळी भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला होता.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान अपडेट

वाचा- भारताला मोठा धक्का; मॅच खेळण्याआधीच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

>> न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारत टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

>> न्यूझीलंडला विजयासाठी ६० चेंडूत हव्यात ६४ धावा

>> राशिद खानने दिला दुसरा धक्का, न्यूझीलंड २ बाद ५७

>> न्यूझीलंडला पहिला धक्का, १ बाद २६

>> २० षटकात अफगाणिस्तानच्या १२४ धावा

>> अफगाणला सहावा धक्का, नजीबुल्ला ७३ धावांवर बाद

>> नजीबुल्लाने ३३ चेंडूत केले अर्धशतक

>> १५ षटकात अफगाणिस्तानच्या ४ बाद ९१ धावा

>> १० षटकात अफगाणिस्तानच्या ४ बाद ५६ धावा

>> ५ षटकात अफगाणिस्तानच्या २ बाद १९ धावा

>> अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरूवात

>> अफगाणिस्तानने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

>> आजच्या लढतीत न्यूझीलंड जिंकल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारताला संधी मिळू शकते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: