राशिद खान म्हणाला, आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट


अबुधाबी: टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढतीला सुरूवात झाली आहे. भारतीय संघासाठी ही फार महत्त्वाची लढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची नजर या सामन्यावर आहे. दोन्ही संघातील लढत सुरू झाली असून अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

वाचा- T20 World Cup: अफगाणिस्तानने दिली भारताला आनंदाची बातमी, न्यूझीलंडविरुद्ध जिंकला…

न्यूझीलंडविरुद्ध सामना सुरू होण्याआधी राशिद खान म्हणाला, आम्ही या सामन्यातील एक भाग आहोत ही गर्वाची गोष्ट आहे. ही मॅच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिली जाईल. टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण चांगली धावसंख्या उभी करता येईल आणि जेणेकरून गोलंदाज धावांचे सरंक्षण करू शकतील.

वाचा- ख्रिस गेल क्रिकेटला करणार अलविदा; ‘या’ मैदानातून घेणार संन्यास

टी-२० वर्ल्डकपमधील सेमीफायनलमधील चार पैकी तीन संघ निश्चित झाले आहेत. ग्रुप ए मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर ग्रुप बी मधून पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता ग्रुप बी मधील दुसऱ्या स्थानासाठी ३ संघांमध्ये स्पर्धा आहे. आज अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास भारताला उद्या नामिबियाविरुद्ध मोठा विजय मिळून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यातील भारतासाठीची चांगली बातमी म्हणजे, आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रथम फलंदाजी संघाला फायदा होतोय. अफगाणिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून आता या संधीचा ते किती आणि कसा फायदा घेतात यावर भारताची गणिते ठरणार आहेत.

वाचा- न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान लढतीत १७ कंपन्यांचा जीव अडकला; मॅचच्या निकालावर

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० च्या फक्त दोन लढती झाल्या आहेत.या दोन्ही लढती वर्ल्डकपमध्ये झाल्या असून त्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. आज अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास तो नवा इतिहास असेल आणि त्याच बरोबर टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी देखील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: