ICCच्या स्पर्धेत २०१२ नंतर प्रथमच असे घडतय; भारतीय संघाशिवाय होणार ही घटना


अबुधाबी: आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताच्या सेमीफायलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. सेमीफायनलमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी स्थान मिळवले.

वाचा- भारताला मोठा धक्का; मॅच खेळण्याआधीच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

भारतीय संघाने ग्रुप फेरीत पहिल्या दोन लढती गमावल्या आणि तेथेच टीम इंडियाचे आव्हान कमकूवत झाले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवले. पण भारताचे आव्हान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या लढतीवर ठरणार होते. आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश न करण्याची ही २०१२ नंतरची पहिली घटना आहे. २०१२ साली श्रीलंकेत झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले होते. त्यानंतर आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारताने किमान बाद फेरीत प्रवेश केला होता. यावेळी मात्र भारताला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

वाचा- न्यूझीलंडने बाजी मारली, अफगाणिस्तानचा पराभव; भारताचा सेमीफायनलचा पत्ता कट

आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक वेळा सेमीफायलनमध्ये पोहोचणारे संघ

ऑस्ट्रेलिया- १६ वेळा
भारत आणि पाकिस्तान- १५ वेळा
न्यूझीलंड- १४ वेळा
इंग्लंड- १३ वेळा

वाचा- न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान लढतीत १७ कंपन्यांचा जीव अडकला; मॅचच्या निकालावर

आज झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागून देखील त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. अफगाणिस्तानचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. त्यांनी २० षटकात ८ बाद १२४ धावा केल्या. उत्तरा दाखल न्यूझीलंडने विजयाचे लक्ष्य २ विकेटच्या बदल्यात पार केले. न्यूझीलंडने भारतासह अफगाणिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग केले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: