भारताला मोठा धक्का; मॅच खेळण्याआधीच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर


अबुधाबी: कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. आज रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची उद्याची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.

वाचा- NZ vs AFG न्यूझीलंडने बाजी मारली, अफगाणिस्तानचा पराभव; भारताचा सेमीफायनलचा पत्ता कट

न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानला चांगली सुरूवात करता आली नाही. १९ धावांवर त्याच्या ३ विकेट पडल्या होत्या. पण त्यानंतर नजीबुल्लाने डाव सावरला आणि अफगाणिस्तानला शतक पूर्ण करून दिले. नजीबुल्लाने ३३ चेंडूत अर्धशतक केले. त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कर्णधार नबीने १४ धावा केल्या तर गुलबदनने १५ केल्या. या शिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धाव करू शकले नाही. डावाच्या सुरुवातीला आघाडीचे फलंदाज गमावल्यामुळे अफगाणिस्तानने मोठ धावसंख्या उभी करण्याची संधी गमावली. अफगाणिस्तानने २० षटकात ८ बाद १२४ धावा केल्या.

वाचा- ‘ही तर तालिबानची इच्छा’; ICCला सांगितले या गोष्टीत बदल करा

विजयासाठी १२५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला २६ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर राशिद खानने सलमीवीर मार्टिन गुप्टिलला २८ धावांवर बाद करून दुसरी विकेट मिळवली. गुप्टिलला बाद करत राशिदने टी-२० क्रिकेटमध्ये ४०० विकेटचा टप्पा पार केला. न्यूझीलंडने १० षटकात २ बाद ६१ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. पण कर्णधार केन विलियमसन आणि डेव्हिड कॉन्वे यांनी संयमी फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळून दिला.कर्णधार विलियमसनने नाबाद ४० तर कॉन्वेने नाबाद ३६ धावा केल्या.

वाचा-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान लढतीत १७ कंपन्यांचा जीव अडकला; मॅचच्या निकालावर

आजच्या लढतीसह आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रुब ए मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रलिया तर ग्रुप बी मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: