भाऊबीज! सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी घालून दिला नवा आदर्श, पाहा Video


हायलाइट्स:

  • सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी घालून दिला नवा आदर्श
  • दिव्यांग मुलीच्या घरी जाऊन केली भाऊबीज

प्रवीण सपकाळ । सोलापूर

सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल (Harish Baijal) यांच्यासाठी यंदाजी भाऊबीज खास ठरली आहे. जन्मापासून दोन्ही हातानी दिव्यांग असणाऱ्या लक्ष्मी शिंदेसोबत बैजल यांनी आपली यंदाची भाऊबीज साजरी केली. आपल्या या संवेदनशील कृतीतून त्यांनी एक आगळावेगळा संदेश दिला आहे.

सोलापूर शहरातील पूर्व भागात राहणाऱ्या लक्ष्मीला जन्मापासून दोन्ही हात नाहीत. पण जन्मतः दिव्यांग असतानाही जिद्द न हरलेल्या लक्ष्मीनं सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलं आहे. घरी हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही लक्ष्मी शिंदेनं शिक्षणाची कास सोडलेली नाही. ती पायाने पेपर सोडवून बारावी उत्तीर्ण झाली असून सध्या ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. लक्ष्मी शिंदेच्या या जिद्दीची कहाणी सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना समजली. बैजल हे नुकतेच सोलापूरात रुजू झाले आहेत. त्यांना लक्ष्मी बाबत माहिती मिळताच त्यांनी भाऊबीजेनिमित्त थेट लक्ष्मीच्या घरी भेट देऊन तिच्याकडून औक्षण करून घेतले. लक्ष्मीने दोन्ही पायांनी बैजल यांचे औक्षण करवून त्यांना स्वतःच्या पायांनी पेढा भरवलाय. पोलीस आयुक्त बैजल यांनी तिची जिद्द व चिकाटीचे कौतुक केले आहे. पोलीस आयुक्तांची ही कृती सरकारी सेवेतील आधिकारी आणि कर्मचारी यांना एक नवा संदेश देणारी ठरली आहे. त्यांचे सोलापूरकरांतून कौतुक होत आहे.

सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांचं लक्ष्मीनं केलं पायांनी औक्षण

भाऊबीज हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळाला तिलक लावते आणि त्याला दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देते. ‘बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका असते. लक्ष्मी शिंदे हिने भावाच्या कपाळी पायाने नामतिलक केला. पायानेच आरती ओवाळली आणि पायानेच पेढा भरवण्यात आला. बंधू-भगिनींच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस लक्ष्मीला स्फूर्ती देऊन गेला.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांची भाऊबीज

ज्या समाजव्यवस्थेत पुरुष वर्ग महिलेला बहीण समजून तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन चालेल व महिला समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस म्हणजे दीपावलीतील खरा भाऊबीज पूजनाचा दिवस ठरेल, अशी लक्ष्मीची भावना आहे. या निमित्तानं तिनं स्त्रित्वाचा सन्मान करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.

हेही वाचा:

‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’

जिल्हा रुग्णालयातील आगीमागचे धक्कादायक सत्य उजेडात, जिथं आग लागली तिथं…

समीर वानखेडेंनी मुंबई शहराला ‘पाताळ लोक’ बनवून टाकलंय: नवाब मलिक

Harish Baijal

हरीश बैजलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: